Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover : ताडदेव–नागपाडा–मुंबई सेंट्रल उड्डाणपुलाचे लोकार्पण, दक्षिण मुंबईच्या वाहतुकीला नवा श्वास

26 Feb 2026 13:54:43
 Taddeo-Nagpada-Mumbai Central Flyover
 
मुंबई : (Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover) ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपूल गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित होणार आहे. हा सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover)
 
दक्षिण मुंबईतील पूर्व–पश्चिम भागांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन्ही दिशेने वाहतुकीसाठी खुला होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.(Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover)
 
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील १३० वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरल्याने तो पाडण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने नव्या उड्डाणपुलाची विक्रमी वेळेत पुनर्बांधणी केली. सप्टेंबर २०२४ मध्ये कार्यादेश देण्यात आल्यानंतर १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आणि अवघ्या १५ महिने ६ दिवसांत काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, निविदेनुसार अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.(Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover)
 
हेही वाचा : satara - साताऱ्यातील किरकसालने मोजली गावातील तरसांची संख्या; महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग
 
या प्रकल्पादरम्यान ‘बेस्ट’ वाहिन्यांचे स्थलांतर, अडथळा ठरणारी निवासी बांधकामे हटविणे व पर्यायी घरे देणे, गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत हलविणे तसेच न्यायालयीन प्रकरणे अशा अनेक अडचणींवर मात करण्यात आली. या पुलाची एकूण लांबी ३३३ मीटर असून पूर्व बाजूस १३८.३९ मीटर, पश्चिम बाजूस १५७.३९ मीटर आणि रेल्वे हद्दीत ३६.९० मीटर अशी विभागणी आहे. ७ मीटर रुंदीचा वाहनमार्ग आणि दोन्ही बाजूंना प्रशस्त पदपथ उपलब्ध आहेत.(Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover)
 
या उड्डाणपुलामुळे जहांगीर बोमन बेहराम मार्ग (पूर्वीचा बेलासिस मार्ग), डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रॅन्ट रोड), पठ्ठे बापूराव मार्ग तसेच महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व–पश्चिम जोडणी पुन्हा सक्षम होणार असून दक्षिण मुंबईच्या वाहतुकीला नवा वेग मिळणार आहे.(Tardeo-Nagpada-Mumbai Central Flyover)
 
 
Powered By Sangraha 9.0