मुंबई : (Sunetra Pawar elected as NCP National President) दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वरळी डोम येथे गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय झाला असून प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली.(Sunetra Pawar elected as NCP National President)
महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादा झटत राहिलेले आपण पाहिले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे सगळे स्वप्न आधुरे राहिले आहेत. परंतु, उनके सपने अधुरे नही रहेंगे, हम सब मिलकर उनके सपने और भी उंचाई पर हम सब लेके जायेंगे, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.(Sunetra Pawar elected as NCP National President)
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ”आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हे अजूनही मन मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे. मात्र, वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडले पाहिजे. कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, हा विचार आहे, परिवार आहे. हा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला निर्धाराने पुढे जावे लागणार आहे. मला आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की दादांची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही. पण त्यांनी दाखवलेला विकास मार्ग, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादी आहे.”
(Sunetra Pawar elected as NCP National President)