Maharashtra Budget Session 2026 Live: 'काय भिकारxx पणा आहे...'; विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली

25 Feb 2026 15:25:40
 
Maharashtra Budget Session 2026 Live
 
मुंबई : (Maharashtra Budget Session 2026 Live) राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या प्रश्नोत्तरांमध्ये समोर आली असून, या मुद्द्यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. वाढत्या आत्महत्यांमुळे संपूर्ण राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने सभागृहात क्षणभर शांतता पसरली. (Maharashtra Budget Session 2026 Live)
 
हेही वाचा:  BMC Budget: ‘डिजिटल ते ड्रग्ज जनजागृती…’ महापालिकेच्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी आणखी काय?
 
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. काय भीकार**पणा सुरू केला आहे. एकीकडे लोक आत्महत्या करतात तर दुसरीकडे ५ ट्रिलियन संदर्भात बोललं जात आहे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (Maharashtra Budget Session 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0