मुंबई : (Farmer kidney sale case) चंद्रपूर जिल्ह्यात सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एका शेतकऱ्याने आपली किडनी विकल्याची विकल्याची धक्कादायक बाब विधानसभेत पुढे आली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सावकारांची संपत्ती गोठवण्याचे निर्देश दिल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात दिली. (Farmer kidney sale case)
खासगी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात अडकून या कर्जाची परतफेड करण्यासाठी ९ जणांनी आपल्या किडण्या विकल्याची माहिती पुढे आली. यापैकी ७ जण परराज्यातील असून, दोघे जण महाराष्ट्रातील आहेत. तर, यातील एक शेतकरी असल्याचेही समोर आले आहे. भाजप आ. अतुल भातखळकर यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील एका शेतकऱ्याने १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. ते व्याजाचे पैसे परत करण्यासाठी तो सावकाराच्या गुंत्यात गुंतत गेला. त्याने सहा वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेतले. या सहा लोकांकडून शेतकऱ्याला कर्जाच्या वसूलीसाठी त्रास दिला. हा त्रास वाढल्यानंतर त्या शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या सहाही लोकांना अटक केली." (Farmer kidney sale case)
हेही वाचा: Maharashtra Budget Session 2026 Live: 'काय भिकारxx पणा आहे...'; विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली
कंबोडिया येथे विकली किडनी
"परंतू, कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कंबोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकून कर्ज फेडले. याप्रकरणाचा तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्थी व्यक्तीने कंबोडिया येथे किडनी विकल्याचे समोर आले. यामध्ये मध्यस्थाने स्वतःसह आणि नऊ व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया तसेच तामिळनाडूतील येथे विकल्या. या प्रकरणात सावकारी करणाऱ्या सहा आरोपींबरोबरच एकुण आठ जणांना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या सहा आरोपींची संपत्ती गोठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत," असे त्यांनी सांगितले. (Farmer kidney sale case)
मकोका लावणार का?
आ. अतुल भातखळकर यांनी ही संघटित गुन्हेगारी असून आरोपींवर मकोका लावणार का? असा सवाल केला. ही गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करून सर्वांना शिक्षा करणार का? तसेच त्या सावकारांचे परवाने रद्द केले का?, असे प्रश्न केले. दरम्यान, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. राज्य आणि देशाबाहेरदेखील याची पाळेमुळे आहेत, असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. (Farmer kidney sale case)