मुंबई : (BMC Budget) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) चा आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा शिक्षण विभागाचा ४२४८.०८ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला. तब्बल पाच वर्षांनंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींमार्फत हा अर्थसंकल्प सादर झाला असून शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. (BMC Budget)
हेही वाचा: *BMC Budget: महापालिकेच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय?*
बजेटमधील प्रमुख तरतुदी.... (BMC Budget)
शिक्षण खात्याचा एकूण अर्थसंकल्प – ४२४८.०८ कोटी रुपयांची तरतूद
मोफत शालेय शैक्षणिक साहित्य – १८७.५७ कोटी रुपयांची तरतूद
इंग्रजी भाषा प्रयोगशाळा – इयत्ता ८ ते १० साठी २७८ शाळांत, ३.८७ कोटी
२ शाळांत विज्ञान पार्क – ५ कोटी रुपयांची तरतूद
सायबर साक्षरता प्रशिक्षण – ८ वी ते ९ वीच्या २० हजार विद्यार्थ्यांसाठी
प्राथमिक शाळा – ११.८० कोटी रुपयांची तरतूद
माध्यमिक शाळा – ११.८० कोटी रुपयांची तरतूद
विज्ञान प्रयोगशाळा अद्ययावत – १० लाख रुपयांची तरतूद
POCSO कायदा व सुरक्षा कायद्याबाबत जनजागृती
ड्रग्ज व व्यसनाधीनतेविरुद्ध विशेष सत्रे
‘गणित गुरुवार’ उपक्रम – १.२० लाख (खान अकॅडमीच्या माध्यमातून सराव)
नवीन शाळा इमारती व दुरुस्ती – ३४० कोटी रुपयांची तरतूद
५७ कामे पूर्ण, १५ कामे यावर्षी पूर्ण
५६९ शालेय इमारतींची देखभाल – १८०.२७ कोटी रुपयांची तरतूद
CCTV बसविणे – ४२ कोटी रुपयांची तरतूद
डिजिटल क्लासरूम
प्राथमिक – २३.३८ कोटी रुपयांची तरतूद
माध्यमिक – १.०८ कोटी रुपयांची तरतूद
मोफत शालेय वस्तू पुरवठा
प्राथमिक – १५०.५७ कोटी रुपयांची तरतूद
माध्यमिक – ३७ कोटी रुपयांची तरतूद
अत्याधुनिक बैठक व्यवस्था – ३४.२८ कोटी रुपयांची तरतूद
BEST बसमधून मोफत प्रवास – ८.७० कोटी रुपयांची तरतूद
खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान – ६९० कोटी रुपयांची तरतूद
नवीन उपक्रमांची घोषणा (BMC Budget)
१० वीमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुंबईतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च पालिका उचलणार
ग्रंथालय अद्ययावत – ५ कोटी रुपयांची तरतूद
संगीत साहित्य खरेदी – ३६ कोटी रुपयांची तरतूद
इयत्ता ३री ते ८वीसाठी वक्तृत्व स्पर्धा रुपयांची तरतूद
‘इको वॉरियर्स’ पर्यावरण उपक्रम – २.४० कोटी रुपयांची तरतूद
दिव्यांग थेरपी साहित्य – १० लाख रुपयांची तरतूद
सांघिक खेळांसाठी सुविधा
३ आर्ट एक्सलेंस सेंटर उभारणार