Navnath Ban: शोकप्रस्तावात ‘ऍनाकोंडा’ शब्दावरून भाजप–शिवसेनेत खडाजंगी

25 Feb 2026 17:51:19
 
Navnath Ban
 
मुंबई: (Navnath Ban) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानिमित्त मुंबई महापालिकेच्या सभागृहात उपमहापौर संजय घाडी यांनी शोकप्रस्ताव मांडला. सर्वपक्षीय सदस्यांनी श्रद्धांजली अर्पित केली; मात्र चर्चेदरम्यान ‘ऍनाकोंडा’ या शब्दावरून भाजप आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात काही काळ तीव्र वाद झाला. (Navnath Ban)
 
भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी बोलताना, पंतप्रधानांचा आदर राखावा, असे अजित दादा पवार यांनी पूर्वी सांगितल्याची आठवण करून दिली. त्याचवेळी काही जण पंतप्रधानांना ‘ऍनाकोंडा’ म्हणतात, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. त्यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. दोन्ही पक्षांतील सदस्य आमनेसामने आल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. उपमहापौरांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. (Navnath Ban)
 
यानंतर विविध पक्षांच्या सदस्यांनी अजित दादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली अर्पित केली. सभागृह नेते गणेश खणकर, अमेय घोले, प्रभाकर शिंदे, श्रद्धा जाधव, अशरफ आजमी आदींनी दादांच्या प्रशासनिक पकडीचा आणि विकासकामांतील योगदानाचा उल्लेख केला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या डॉ. सईदा खान या आठवणी सांगताना भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. (Navnath Ban)
 
अखेरीस अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करून सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (Navnath Ban)
 
Powered By Sangraha 9.0