मुंबई : (The Kerala Story 2) 'द केरला स्टोरी २' (The Kerala Story 2) या चित्रपटावरील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. अदा शर्मा अभिनित 'द केरला स्टोरी' या पहिल्या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल चर्चेत आला आहे. पहिल्या भागाच्या वेळी वाद आकडेवारीवरून निर्माण झाला होता, मात्र यावेळी कारण वेगळे आहे. 'द केरला स्टोरी २' (The Kerala Story 2) चित्रपटाच्या ट्रेलरमधून दाखवण्यात आलेल्या वास्तविकतेने अनेकांना पोटशूळ उठल्याचे निदर्शनास आलेय.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्माते विपुल शाह यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत देशभरातील पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणण्यात आले. व्यासपीठावर आगामी चित्रपटाचा आधार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या वास्तविक कथांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात बंगाल, बिहार, भीलवाडा, गंगापूर, राजकोट, उदयपूर, जम्मू, महाराष्ट्र, भोपाळ, झारखंड, फरीदाबाद, मेरठ, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि इंदूर येथील लोक सहभागी झाले होते. आयोजकांच्या माहितीनुसार, एकूण ५५ मुली आणि ३३ कुटुंबीयांनी पुढे येऊन आपले अनुभव मांडले.(The Kerala Story 2)
मंचावर ४९ पीडित आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते, तर काही जण प्रेक्षकांमध्ये बसले होते. या पत्रकार परिषदेत चित्रपटाची टीमही सहभागी झाली होती. यात निर्माता विपुल अमृतलाल शाह, दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह, सहनिर्माते आशिन ए. शाह तसेच प्रमुख कलाकार उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया उपस्थित होते. एकूण पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसह चित्रपट निर्माते व कलाकारांचे सहा सदस्य कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.(The Kerala Story 2)
याप्रसंगी लव्ह जिहादच्या सापळ्यतून वाचलेल्या मुली आणि कथित मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांचा संयुक्त गट असे वर्णन करण्यात आले. अनेकांनी माध्यमांशी संवाद साधत आपले अनुभव कथन केले आणि या विषयाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा चित्रपट कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. यात तीन हिंदू मुली; उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या हादरवून टाकणाऱ्या कथेला पडद्यावर आणले आहे. तीन धर्मांध मुस्लिम तरुणांशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला भीषण वळण लागते आणि हे संबंध हळूहळू कथित धर्मांतराच्या नियोजित अजेंड्याचा भाग असल्याचे उघड होते.(The Kerala Story 2)
हेही वाचा : मेक्सिकोचा मेंचो मेला तरी...
राष्ट्रीय रायफल शूटर तारा शाहदेव, ज्या स्वतः कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील पीडित राहिल्या आहेत, त्यांनी म्हटले, “हिंदू मुलींनी सावध राहावे, अशी माझी इच्छा आहे. कुटुंबांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवावा आणि त्यांना साथ द्यावी.” तारा यांनी आपल्या आयुष्यातील त्या भयावह अध्यायाची आठवण करून दिली, जेव्हा ७ जुलै २०१४ रोजी रांची येथे त्यांचा विवाह रंजीत सिंह कोहली नावाच्या व्यक्तीशी झाला. मात्र विवाहानंतर त्याचे खरे नाव रकीबुल हसन असल्याचे उघड झाले. तारा यांच्या मते, विवाह फसवणुकीने लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला. विरोध केल्यावर शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्यांना कुत्र्यांकडून चावून घेण्यासारख्या अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. त्यांनी आरोप केला की इस्लाम स्वीकारला नाही तर त्यांच्या वडिलांचा व भावाचा खून करण्याची आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की पोलिसांनी त्यांना रकिबुल हसनच्या घरातून बाहेर काढून थेट रुग्णालयात दाखल केले. प्रेमाच्या नावाखाली हिंदू मुलींना योजनाबद्ध पद्धतीने जाळ्यात ओढले जात असल्याचा त्यांचा आरोप होता.(The Kerala Story 2)
निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी सांगितले की हा चित्रपट ७०–८० एफआयआर आणि विविध न्यायालयीन निर्णयांच्या अभ्यासानंतर तयार करण्यात आला आहे. हा कोणत्याही समुदायाविरोधातील मोहीम नसून समाजजागृतीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. द केरला स्टोरी 2- गोज़ बियॉन्ड हा २०२३ मधील पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यावेळी कथा केवळ केरळपुरती मर्यादित न राहता राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांपर्यंत विस्तारते.(The Kerala Story 2)
जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्याचा दबाव
मुंबईतील दोन युवतींनी सांगितले की त्यांना एका दरग्यात नेण्यात आले, पाणी पाजण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार व सामूहिक बलात्कार करण्यात आला. सुरुवातीला पोलिसांकडून सहकार्य न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्याचा दबाव, तसेच ‘हलाला’सारख्या वेदनादायक घटनांचा उल्लेख त्यांनी केला. हे ऐकून उपस्थितांची अंगावर काटा आला.(The Kerala Story 2)
चित्रपटाची कथा सत्य घटनांवर प्रेरित...
एका मुलाखतीत कामाख्या सिंह म्हणालेत की, “मी कोणताही चित्रपट किंवा माहितीपट बनवण्यापूर्वी त्यात दाखवली जाणारी समस्या समजून घेतो आणि त्यासाठी सखोल संशोधन करतो. या चित्रपटाची कथा सत्य घटनांवर प्रेरित असल्याचा दावा करत मी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले आहे. यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. जर आम्ही चित्रपटात काहीही चुकीचे दाखवले असेल, तर मी चित्रपट बनवणे सोडून देईन.”(The Kerala Story 2)