अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर...

24 Feb 2026 16:55:19
Sonali Kulkarni
 
मुंबई : (Sonali Kulkarni) मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मावस भावाचे निधन झालं आहे. तिने नुकतीच सोशल मिडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीचा मावस भाऊ अनिरुध्द चेरेकर याच्यासोबत फोटो शेअर करत आपल्या भावना या व्यक्त केल्या आहेत. सोनाली आणि तिचे घरचे त्याला प्रेमाने ‘अन्नूमा’असे म्हणत. ती दरवर्षी त्याला राखीही बांधायची तिने ते फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
 
सोनाली कुलकर्णीची पोस्ट
 
"आमचा अन्नूमा... हे जग सोडून गेला. तुला तिथे शांती मिळो आणि वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. अध्यात्मिक, निरागस, जीव लावणारा आणि निर्मळ मनाचा तू व्यक्ती होतास. तुझं प्रत्येकासोबत सुंदर नातं होतं. सगळ्यांवर तू निस्वार्थ प्रेम केलंस. तू तबला वाजवायचास सगळी गाणी तुला माहिती होती आणि तुझ्या हाताचा चहा...तू जसा आहेस तसाच राहिलास आणि सगळ्यांना प्रेम दिलेस... आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती"
 
 
सोनालीच्या पोस्टवर चाहत्यांनी केले दु:ख व्यक्त
 
सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे श्रद्धांजली अर्पण करत तिच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगी बळ मिळो, अशी प्रार्थना केली आहे.
Powered By Sangraha 9.0