मुंबई : (Power Grid Corporation of India Limited) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Limited) संदर्भात मोठा निर्णय देत गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पॉवरग्रीड आपल्या प्रत्येक उपकंपनीत पाच कोटींऐवजी साडेसात कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहे. मात्र कंपनीच्या एकूण संपत्तीच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही, ही अट कायम ठेवण्यात आली आहे.(Power Grid Corporation of India Limited)
या निर्णयामुळे पॉवरग्रीडला आपल्या मुख्य व्यवसायात अधिक गुंतवणूक करता येणार असून विशेषतः नवीकरणीय ऊर्जेच्या वहनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे सुलभ होणार आहे. देशाने २०३०पर्यंत ५०० गिगावॅट नॉन-फॉसिल (अजैव इंधनाधारित) ऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सौर व पवन ऊर्जेचे प्रकल्प दूरवरून राष्ट्रीय ग्रीडशी जोडण्यासाठी मजबूत ट्रान्समिशन नेटवर्क उभारणे अत्यावश्यक आहे.(Power Grid Corporation of India Limited)
मोठ्या प्रकल्पांना गती
या निर्णयामुळे कंपनीला अतिउच्च दाबाच्या आणि एचव्हीडीसीसारख्या मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये भाग घेता येईल. यामुळे देशातील वीज पुरवठा अधिक मजबूत होईल. भारताने २०३०पर्यंत ५०० गिगावॅट नॉन-फॉसिल ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा निर्णय त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी सकारात्मक ठरणार आहे.(Power Grid Corporation of India Limited)
हेही वाचा : Rajya Sabha: राज्यसभेवर पार्थ पवारांची एन्ट्री पक्की? महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव चर्चेत
स्पर्धा वाढणार, वीज स्वस्त होणार
हा निर्णय टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग (TBCB) प्रक्रियेत अधिक स्पर्धा निर्माण करेल. स्पर्धेमुळे दरनिर्धारण पारदर्शक होऊन ग्राहकांना स्वस्त आणि स्वच्छ वीज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.(Power Grid Corporation of India Limited)
ऊर्जा क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. पॉवरग्रीड सारख्या अनुभवी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला अधिक वित्तीय स्वातंत्र्य मिळाल्याने देशाच्या ऊर्जा सुरक्षेला आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळणार आहे.(Power Grid Corporation of India Limited)
सामान्य नागरिकांना काय फायदा?
देशात सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांत वाढ
वीज गावागावात पोहोचवण्यासाठी वीजवाहिनीचे मजबूत जाळे
पॉवरग्रीडला मोठे वीज प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक वाढणार
नागरिकांना भविष्यात स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध होणार