मुंबई : (Lucknow University Namaz Row) लखनऊ विद्यापीठाच्या लाल बारादरीजवळ नमाज पठण आणि घोषणाबाजी केल्याबद्दल १३ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस देऊन जामीनासाठी ५०,००० रुपये भरण्यास सांगितले आहे. लखनऊ आयुक्तालयाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या बांधकामात व्यत्यय आणला आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करून शांतता धोक्यात आणली.(Lucknow University Namaz Row)
त्यामुळे भविष्यात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमांखाली ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने संबंधित सर्व विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी शांतता राखण्याची हमी म्हणून ५०,००० रूपये जामीन आणि दोन जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कृत्य वारंवार होण्याची शक्यता असल्याने हि कारवाई केली गेली आहे.(Lucknow University Namaz Row)
हेही वाचा : राष्ट्रपती भवनातील एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी आता राजगोपालाचारी यांचा पुतळा; ब्रिटिशांचे पुतळे काढून गुलामीची मानसिकता नष्ट करण्याचा प्रयत्न
बांधकाम थांबवून घोषणाबाजी केल्याचा आरोप
पोलिसांनी अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला आणि कॅन्टीनसमोर रस्त्यावर बसून निषेध केला. यामुळे विद्यापीठ कॅम्पसच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम झाला. तसेच तिथे चालू असलेल्या बांधकाम कामातही व्यत्यय आला.(Lucknow University Namaz Row)
वादानंतर प्रशासन 'हाय अलर्टवर'
नमाज पठणानंतर काही हिंदू विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विद्यापीठ प्रशासन आणि पोलिस विद्यापीठातील हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत.(Lucknow University Namaz Row)