BMC Corporators : स्वीकृत नगरसेवकांची नावे ठरली... कोणा-कोणाची नावे पुढे?

24 Feb 2026 15:14:06
BMC Corporators
 
मुंबई : (BMC Corporators) मुंबई महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे अंतिम झाल्याची माहिती समोर आली असून बुधवारी सभागृहात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.(BMC Corporators) यंदा प्रथमच स्वीकृत सदस्यांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली आहे. त्यामुळे २२७ निवडून आलेल्या नगरसेवकांसह सभागृहातील एकूण सदस्यसंख्या २३७ झाली आहे.(BMC Corporators)
 
नव्या वाटपानुसार भाजपला चार, शिवसेना (उद्धव गट)ला तीन, शिवसेना (शिंदे गट)ला दोन आणि काँग्रेसला एक जागा देण्यात आली आहे. भाजपकडून प्रवीण छेडा, नितेश सिंह, प्रतिप करपे आणि कमलाकर दळवी यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. शिवसेना (उद्धव गट)कडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलाश पाठक यांची निवड ठरली आहे. शिवसेना (शिंदे गट)कडून राज सुर्वे, बालकृष्ण ब्रीद आणि उमेश माने यांची नावे पुढे आली आहेत. काँग्रेसकडून वीरेंद्र चौधरी यांचे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती आहे.(BMC Corporators)
 
हेही वाचा : Ranchi Air Ambulance Crash : विमान दुर्घटनांची मालिका सुरुच! झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू  
 
स्वीकृत नगरसेवकांना सभागृहात किंवा वैधानिक समित्यांमध्ये मतदानाचा अधिकार नसतो; मात्र त्यांना निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणेच विकासनिधी उपलब्ध होतो. त्यामुळे स्थानिक विकासकामांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.(BMC Corporators)
 
 
Powered By Sangraha 9.0