नाशिक : (Maharashtra Love Jihad Row) सिन्नर शहरातील अल्पवयीन मुलीला युवकाने फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने सिन्नर येथे नाशिकपुणे महामार्गावरील बसस्थानकाजवळ मोठे आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.(Maharashtra Love Jihad Row)
भराडवाडी येथील १७ वर्षीय मुलगी गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता असून, तिला एका युवकाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसांत दिली आहे. अद्याप मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून तीव्र आंदोलन पुकारण्यात आले.(Maharashtra Love Jihad Row)
यावेळी सागर बेग, हर्षु ठाकूर, किन्नर आखाड्याच्या शुभांगी शिंदे, जयराम गीते, गजानन आव्हाड, भाजप नेते जयंत आव्हाड, तालुका प्रभारी ज्ञानेश्वर कुर्हाडे, शहराध्यक्ष सजन सांगळे, समाधान केकाण, कीर्ती अंकार, प्रियांका द्विवेदी, सुमन जोशी, सविता कोठुरकर, निखिल लहामगे आदिंसह बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून एसटी बस व इतर वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली.(Maharashtra Love Jihad Row)
हेही वाचा : Kerala to Keralam : केरळ होणार ‘केरळम्’! नामांतरास मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी
आंदोलनादरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने तथाकथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. राज्यात फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरण रोखण्यासाठी कडक कायदा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बेपत्ता मुलीचा तातडीने शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.(Maharashtra Love Jihad Row)
कायद्याचा मसुदा लवकरात लवकर करावा
तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष समितीमार्फत कायद्याचा मसुदा तयार करून लवकरात लवकर तो जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. इतरही राज्यांत अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला.(Maharashtra Love Jihad Row)