
मुंबई : बांगलादेशमध्ये नवीन 'बीएनपी' सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचार सुरूच आहेत. भोला जिल्ह्यातल्या तजुमुद्दीन भागात मंदिरात कीर्तनाला जात असताना एका २५ वर्षीय अपंग हिंदू महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये ई-रिक्षा चालकासह तीन पुरूषांनी रात्रीच्या अंधारात हे क्रूर कृत्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हि घटना रविवारी २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली, जेव्हा एक हिंदू महिला कीर्तनाला जाण्यासाठी घराबाहेर पडली. तीला ई-रिक्षा दिसल्यानंतर तिथे किर्तनस्थळी सोडणार का? अशी विचारणा केली असता, चालकाने होकार दिला. यावेळी रिक्षात चालकासह तीन जण आधीच बसलेले होते.
यावेळी चालकाने ई-रिक्षा एका निर्जन भागात थांबवली आणि तिला बाजूच्या अंधारात ओढत नेले, तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करून चौघेही तिथून पसार झाले. काही वेळानंतर स्थानिकांना घटना लक्षात येताच त्यांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. यावेळी पिडिता पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तजुमुद्दीन पोलिस स्टेशनचे प्रभारी अब्दुस सलाम म्हणाले की, पीडितेची प्रकृती सुधारल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. सध्या आरोपींचा शोध चालू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.