विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची लग्नाची अधिकृत घोषणा; ‘VIROSH’ नावाने नात्याची सुरुवात

23 Feb 2026 13:52:03

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna

 मुंबई : (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna) लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासुन सोशल मिडियावर भलतेच चर्चेत होते. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र त्यांच्या या चर्चाचं स्पष्टीकरण हे त्यांनी दिले नव्हते.
 
सुरुवातीच्या काळात ते दोघे नात्यात असुन लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकतेच सोशल मिडियावर काही दिवसांपुर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली होती. तरीही या सर्व चर्चांवर विजय आणि रश्मिका यांनी मौन बाळगले होते. आता मात्र त्यांनी सोशल मिडियावर स्टोरी शेअर करून आपल्या लग्नाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या नात्याला आणि लग्नाला चाहत्यांनी दिलेलं ‘VIROSH’ हे नाव दिलं आहे.
  
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, " कोणतेही योजना आखण्यापूर्वी किंवा स्वत:साठी काहीही निवडण्यापूर्वी तुम्ही आमच्या सोबत होता. तुम्ही इतक्या प्रेमाने आम्हांला विरोश (VIROSH) हे नाव दिले म्हणुनच आम्ही आमच्या नात्यांची सुरवात याच नावाने करतो. विरोश हे नाव आम्ही आमच्या लग्नाला देतो आहे. आम्हांला इतक्या प्रेमाने साथ दिल्याबद्दल धन्यवाद...". मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये पार पडणार असुन, रिसेप्शन हे ४ मार्चला आयोजित करण्यात येणार आहे.
 
हेही वाचा : ‘...भावना कळत नाहीत’; स्मृती मानधनाची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
 
दरम्यान, या जोडीने प्रथम २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्यानंतर ‘Dear Comrade’ या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले.
 
 
Powered By Sangraha 9.0