Dr. Mohanji Bhagwat : हिंदुत्वाचे राजकारण नव्हे, व्यक्ती निर्माणातून समाजउन्नती!

23 Feb 2026 14:22:14
Dr. Mohanji Bhagwat

मुंबई : (Dr. Mohanji Bhagwat) संघ हिंदुत्वाचे राजकारण करत नाही, तर व्यक्ती निर्माणातून समाजाच्या उन्नतीचे काम करतो. भ्रष्टाचार मनापासून सुरू होतो आणि तो तिथेच नष्ट करता येऊ शकतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr. Mohanji Bhagwat) यांनी केले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षपूर्ती निमित्त '१०० वर्षांची संघ यात्रा : नवे क्षितिज, नवे आयाम' या विषयावर प्रमुख जनगोष्ठी आणि विविध क्षेत्र समन्वित संवादाचे आयोजन हिमालयन कल्चरल सेंटरच्या सभागृहात करण्यात आले होते.(Dr. Mohanji Bhagwat)
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक (Dr. Mohanji Bhagwat) पुढे म्हणाले, सामाजिक कुरीती आणि भेदभावाचे मूळ कारण व्यवस्था नसून मानवी मन आहे. अंधाराला मारून नव्हे तर प्रकाश प्रज्वलित करून अंधार दूर करता येते. व्यवहारातील परिवर्तनातूनच भेदभाव नष्ट होईल. संघातील अनेक स्वयंसेवक दशकानुदशके कार्य करतात, परंतु ओळखीची अपेक्षा ठेवत नाहीत, कारण कार्यच प्रधान आहे.(Dr. Mohanji Bhagwat)
 
हेही वाचा : Divyang Sahayak Portal Inauguration : दिव्यांगांच्या सेवांना डिजिटल गती देणाऱ्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन 
 
डिजिटल युगाबाबत त्यांनी सांगितले की, तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. त्याचा वापर संयम आणि शिस्तीने व्हावा. कुटुंबात आत्मीयता आणि वेळ देणे आवश्यक असून तंत्रज्ञानासाठी मनुष्याचे बलिदान देता येणार नाही. जे संघटित होण्यासाठी कार्य करतात तेच हिंदू आहेत, असे सांगत त्यांनी मातृभूमीप्रती भक्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. जग सत्यापेक्षा शक्तीला अधिक महत्त्व देतंय, म्हणून शक्ती अर्जित करणे गरजेचे आहे; मात्र तिचा वापर मर्यादित असावा.(Dr. Mohanji Bhagwat)
 
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रबुद्ध नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.(Dr. Mohanji Bhagwat)
 
 
Powered By Sangraha 9.0