Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस नदीत कोसळून १९ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन विदेशी नागरिकांचा समावेश

23 Feb 2026 12:21:59

Nepal Bus Accident

मुंबई : (Nepal Bus Accident)
नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. पोखराहून काठमांडूला जाणारी प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात पुरुष आणि महिलांचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये दोन न्यूझीलंडमधील पर्यटकांचा देखील समावेश आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

३०० मीटर खोल नदीत कोसळली बस

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, प्रवासी बस पहाटे १ वाजताच्या सुमारास पृथ्वी महामार्गावरून जात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उतारावरून सुमारे ३०० मीटर खाली नदी पात्रात कोसळली. धाडिंग जिल्ह्यातील बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिका-५ मधील भैसेपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते.

अपघाताची माहिती मिळताच नेपाळ लष्कर आणि पोलिस दल घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु करण्यात आले. निसरडा रस्ता, अंधार, अपुरी सुविधा यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गंभीर जखमीही प्रवाशांचा समावेश असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Powered By Sangraha 9.0