१०,००० हून अधिक वृक्ष संवर्धनाबद्दल डॉ. विशाल कडणे यांची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये मानाची नोंद

23 Feb 2026 18:19:42

मुंबई : (Dr. Vishal Kadane) डॉ. विशाल कडणे हे गेल्या काही वर्षांपासुन प्रदूषणमुक्त पर्यावरण, दुर्मिळ जातींचे वृक्ष संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण या उद्दिष्टांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. २०१८ पासून त्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले असून १०,००० हून अधिक मोठ्या वृक्षांचे संवर्धन केल्याबद्दल त्यांच्या नावाची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे.

पर्यावरण विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त असलेले डॉ. कडणे गेली १५ वर्षे वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. शाश्वत विकास, हरित उपक्रम, जैवविविधता संरक्षण आणि शहरी हरित क्षेत्रांचा विस्तार या विषयांवर त्यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.

विशेष म्हणजे त्यांनी दुर्मिळ आणि स्थानिक जातींच्या वृक्षांचे जतन व संवर्धन, पर्यावरण जनजागृती मोहिमा आणि नागरिकांच्या सहभागातून हरित चळवळ उभी करण्याचे कार्यही सातत्याने पार पाडले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली असुन त्यांना याबाबत सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ कडणे यांच्या पर्यावरणीय धोरणे, वृक्षसंवर्धन मोहिमांचा अनुभव मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका तसेच वृक्ष प्राधिकरणाला निश्चितच उपयुक्त ठरू शकणार आहे असे ठरु शकणार आहे असे मत आता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.




Powered By Sangraha 9.0