Maharashtra Vidhan Parishad 2026 Live: ‘राज्याने दादांच्या रूपात न लाभलेला...’; फडणवीसांची अधिवेशनात भावनिक आठवण

23 Feb 2026 13:52:25
 
Maharashtra Vidhan Parishad 2026 Live
 
मुंबई : (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, दि. २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
“राज्याने दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांमध्ये मुख्यमंत्रिपदाची क्षमता होती. मात्र दादांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवली, याची हळहळ नेहमीच राहील. दुर्दैवाने अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही मोठी खंत आहे,” असे फडणवीस यांनी सभागृहात म्हटले. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
हेही वाचा:  Sunetra Pawar Statement: अजित पवारांच्या अपघातावर सुनेत्रा पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या...
 
दरम्यान, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार असून ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. वित्त खात्याची जबाबदारी यापूर्वी अजित पवार यांच्याकडे होती. मात्र मागील महिन्यात बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
त्यांच्या अकाली निधनामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच झालेल्या या भावनिक उल्लेखामुळे सभागृहात काही क्षण गांभीर्याचे वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0