Chitra Wagh: ‘राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले…’; चित्रा वाघ सभागृहात भावुक

23 Feb 2026 16:41:00
 
Chitra Wagh
 
मुंबई : (Chitra Wagh) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक सदस्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाजपच्या विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ या भावनिक झाल्या आणि भाषण करताना त्यांचा कंठ दाटून आला. (Chitra Wagh)
 
चित्रा वाघ म्हणाल्या, “माझ्यासारख्या कार्यकर्तीला २० वर्षे अजित दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि निर्णयक्षमता आम्ही जवळून पाहिली आहे. सत्तेत असो वा विरोधी पक्षात, दादांच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत.” (Chitra Wagh)
 
हेही वाचा: Maharashtra Vidhan Parishad 2026 Live:‘माझे शेणाचे हात पेनाला लावणारे अजितदादा’; अमोल मिटकरींच्या शब्दांनी सभागृह भावुक    
 
२७ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “मी प्रदेश कार्यालयातून बाहेर पडताच अनेक फोन आले, पण बोलण्याची इच्छा नव्हती. त्याच वेळी दादांचा फोन आला. ‘तुमच्यासोबत जे घडलं त्याची मला कल्पना आहे; पण मी काही करू शकलो नाही,’ असं त्यांनी सांगितलं. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का?, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. मी होकार दिल्यावर त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उत्तम काम कराल, असा विश्वास व्यक्त केला.” त्यांच्या या आठवणींनी सभागृहात क्षणभर भावनिक वातावरण निर्माण झाले. (Chitra Wagh)
 
 
Powered By Sangraha 9.0