कल्याण : (Rishikesh Kelkar) "छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रमी नव्हते तर ते आर्थिक व सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते" असे उद्गार बर्नस व मॅकडोनेल कंपनीचे जनरल मॅनेजर व कल्याणचे प्रभावी वक्ते ऋषिकेश केळकर (Rishikesh Kelkar) यांनी शिवजयंती उत्सव कार्यक्रमात काढले.
एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या जानकीदेवी बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांनी जुहू-सांताक्रूझ कॅम्पस येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले "छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमाती, शेतकरी, शेतमजूर यातून पराक्रमी मावळे तयार केले. त्यांना लष्करी शिक्षण देवून प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. रोख पगाराची व्यवस्था करुन आर्थिक स्थैर्य दिले, शेती व उद्योग धंद्याला संरक्षण देवून सामाजिक व आर्थिक क्रांती केली. डिग्री मिळवून समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होणाऱ्या मुलींनी महाराजांचे चरित्र, त्यांचे मॅनेजमेंट अभ्यासले पाहिजे व त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत" असे त्यांनी आवाहन केले.(Rishikesh Kelkar)
हेही वाचा : Maharashtra Vidhan Parishad 2026 Live:‘माझे शेणाचे हात पेनाला लावणारे अजितदादा’; अमोल मिटकरींच्या शब्दांनी सभागृह भावुक
या शिवजयंतीच्या उपक्रमामागे जेडीबीआयएमएस डायरेक्टर प्रो. डाॅ. महेश शितोळे यांचे कल्पक नेतृत्व, प्रेम आणि दूरदृष्टी होती. या प्रसंगी १५० हून अधिक विद्यार्थीनी, शिक्षक, प्रा. डाॅ. गीता, सामाजिक कार्यकर्ते अजय जगताप व बर्न्स ॲड मॅकडोनेल कंपनीच्या एच आर. मॅनेजर भाग्यश्री झाडे उपस्थित होत्या.