मुंबई : (Baby Punch) सध्या सोशल मिडियावर 'बेबी पंच' च्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. इन्साग्रामवर पंच कुन नावाच्या बेबी मंकीचा व्हिडिओ पाहून अनेक जण नकळत भावुक झाले. या 'बेबी पंच' ला जन्मताच त्याच्या आईने सोडून दिले होते. यानंतर त्याने एका बाहुलीचा आधार घेतला होता. तो त्या बाहुलीला मिठी मारून बसला होता आणि तोच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांच मन हेलावून गेले होते.
आता मात्र माकडात राहणारा एकटा 'बेबी पंच' ला अखेर आधार मिळाला आहे. तो आता त्यांच्या समुहात रमू लागला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यात त्याला एका वयस्कर मादी माकडाने मिठीत घेतले आहे. ज्या मायेच्या स्पर्शाची तो आतुरतेने वाट पाहत होता, तो स्पर्श अखेर त्याला मिळाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देली असुन त्यांनी आनंद ही व्यक्त केला आहे.
'बेबी पंच' चा जन्म जपानमध्ये इचिकावा शहरातल्या प्राणी संग्रहालयात २६ जुलै २००५ रोजी झाला. जन्मताच त्याच्या आईने त्याला सोडून दिले होते. यानंतर त्याची काळजी ही प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी घेतली होती. कर्मचार्यांनी त्याला एक बाहुली आणून दिली. याच खेळण्याचा त्याने आधार घेतला होता. तो दुसर्या माकडासोबत जाण्याचा प्रयत्नही करायचा परंतु ते माकडे त्याला हुसकावून लावायचे. यानंतर मात्र त्याने याच बाहुलीचा आधार घेतला तो तिच्यासोबत राहायचा. मात्र आता परिस्थिती बदलली असून त्याला मायेचा आधार अखेर मिळाला आहे.