Maharashtra Vidhan Parishad 2026 Live:‘माझे शेणाचे हात पेनाला लावणारे अजितदादा’; अमोल मिटकरींच्या शब्दांनी सभागृह भावुक

23 Feb 2026 15:22:32
 
Maharashtra Vidhan Parishad 2026 Live
 
मुंबई : (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी संपूर्ण सभागृह भावुक झाले होते. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
“अजितदादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा,” असे म्हणत मिटकरींनी आपल्या राजकीय प्रवासाची कहाणी सांगितली. घरात कोणताही राजकीय वारसा नसताना दादांनीच मला राजकारणात संधी दिली आणि आमदार केले, असे त्यांनी नमूद केले. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
हेही वाचा:  Maharashtra Vidhan Parishad 2026 Live: ‘राज्याने दादांच्या रूपात न लाभलेला...’; फडणवीसांची अधिवेशनात भावनिक आठवण
 
“मी करेन तर आमदार त्यालाच करेन,” असे दादांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केल्याची आठवण सांगताना मिटकरींचा कंठ दाटला. त्यांच्या या भावनिक भाषणामुळे सभागृहात काही काळ स्तब्ध वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
२०१९ मध्ये बारामतीतील एका व्याख्यानातून अजित पवारांनी त्यांना ओळखले. संभाजी महाराजांवरील त्यांचे भाषण ऐकून प्रभावित झालेल्या दादांनी त्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली. पुढे शिवस्वराज्य यात्रेत सहभाग, राज्यभर सभा आणि विधानसभा निवडणुकीत ६८ प्रचारसभा अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली. (Maharashtra Vidhan Parishad 2026 Live)
 
 
Powered By Sangraha 9.0