मुंबई : (Sunetra Pawar Statement) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून, याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली. (Sunetra Pawar Statement)
हेही वाचा : अधिवेशनाच्या तोंडावर मोठा निर्णय! उपमुख्यमंत्री शिंदेंकडील महत्त्वाची खाती इतर मंत्र्यांकडे...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आधीच उत्तर दिले आहे. आम्हीही चौकशीसाठी पत्र दिले आहे. चौकशीअंती सर्व सत्य समोर येईल.” (Sunetra Pawar Statement)
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात पारदर्शकतेवर भर दिला. “या अपघातातील प्रत्येक गोष्ट जनतेसमोर यायलाच हवी. आम्हीही त्याचा सातत्याने पाठपुरावा करू,” असे ते म्हणाले. (Sunetra Pawar Statement)