Melghat Accident : मेळघाटात भीषण अपघात, बोलेरो पिकअप ५० फूट दरीत कोसळलं, पाच जणांचा जागीच मृत्यू

23 Feb 2026 17:40:15

Melghat Accident)

मुंबई : (Melghat Accident) अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बोलेरो पिकअप खोल दरीत कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - Bombay High Court : अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दणका! कर्जखाते फसवी ठरवण्याच्या प्रक्रियेवरील स्थगिती उठवली

मृतांमध्ये एका महिलेचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आठवडी बाजारावरून परत येत असताना शिवझरी ते राणीगाव दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

जखमींना तात्काळ उपचारासाठी धारणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातातील सर्व मृतक कंजोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

Powered By Sangraha 9.0