मुंबई : (Shraddha Kapoor) बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली श्रद्धा कपूरची लोकप्रियता व चाहतावर्ग खूप मोठा आहे. भारतातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये श्रद्धा कपूर ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी ईठा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगसाठी श्रध्दा कोल्हापुरात आली होती. यावेळी तिने आवर्जून आई अंबाबाईचे दर्शन घेतले. तिच्यासोबत यावेळी मराठी अभिनेता आनंद काळे ही उपस्थित होता. श्रध्दा कपूर रेल्वेने कोल्हापुरात पोहोचली होती. तिला कोल्हापुरात पाहिल्यावर चाहत्यांना आनंदाचा धक्काच बसला. ईठा या चित्रपटातील पूर्ण टीमने ही तिच्यासोबत देवीचे दर्शन घेतले.
हेही वाचा : हार्दिक पांड्याकडून एक्स वाइफ आणि मुलगा अगस्त्य यांना ४ कोटीची आलिशान कार भेट...
यावेळी मंदिरात तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दीही केली होती. श्रद्धाने आई अंबाबाईच्या चरणी साडी, चोळी व श्रीफळ अर्पित केला आणि तिच्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनाही केली. मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला देवीच्या चरणी अर्पण केलेला गजरा आशीर्वाद म्हणून दिला.
‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हेच ‘ईठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.