Shikhar Dhawan Wedding: गब्बर पुन्हा अडकला लग्नबंधनात! शिखर धवनचा मोठ्या उत्साहात सोफी शाईनशी विवाह, कोण आहे सोफी शाईन?

22 Feb 2026 13:59:10


 
Shikhar Dhawan Wedding

मुंबई : (Shikhar Dhawan Wedding) भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शिखरने त्याची मैत्रीण सोफी शाईन हिच्याशी दिल्ली-एनसीआरमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित विवाह केला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत होती, त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. (Shikhar Dhawan Wedding)
 
शिखरच्या लग्नाचे पहिले फोटो त्यांचा जवळचा मित्र आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने सोशल मीडियावर शेअर केले. “मेरे यार की शादी है” असे कॅप्शन देत त्याने शिखर आणि सोफीयाचे फोटो पोस्ट केले. हे फोटो पाहताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या समारंभाला केवळ कुटुंबीय आणि मोजके मित्र उपस्थित होते. (Shikhar Dhawan Wedding)
 






View this post on Instagram
















A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)


कोण आहे सोफी शाईन?
 
सोफी शाईन ही मूळची आयर्लंडची असून ती प्रॉडक्ट कन्सल्टंट आहे. सध्या ती अबू धाबीतील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन येथे सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. २०२५ पासून दोघे एकमेकांना डेट करत होते आणि १२ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. (Shikhar Dhawan Wedding)
 






View this post on Instagram
















A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)


शिखरचा दुसरा विवाह...
 
हे शिखर धवनचे दुसरे लग्न असून, यापूर्वी त्याचा विवाह आयेशा मुखर्जीशी यांच्याशी झाला होता. २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता जुन्या आठवणींना मागे सारत शिखरने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. लग्नापूर्वी हळद आणि संगीत समारंभही उत्साहात पार पडले. “Almost The Dhawans” अशी कॅप्शन देत शिखरने संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. आता अधिकृतपणे हे दोघे पती-पत्नी झाले असून सोशल मीडियावर त्यांच्या जोडीचे कौतुक होत आहे. (Shikhar Dhawan Wedding)
Powered By Sangraha 9.0