मुंबई : (Chagos Islands) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चॅगोस बेटांची मालकी मॉरिशसला न सोपावण्याबाबत ब्रिटनला इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या इशार्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणार एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 2025च्या एका करारानुसार, ब्रिटन चॅगोस बेटांची मालकी अधिकृतरित्या मॉरिशसकडे सोपावणार असून, त्यावर असलेला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असा, लष्करी तळ स्वत:कडेच ठेवणार आहे. (Chagos Islands)
चॅगोस बेटांवरील दिएगो गार्सिआ बेटावरुन सध्या वादाची ठिणगी पडली असून, ब्रिटनने या बेटांबाबत मॉरिशसशी कोणतेही लीज करार करु नये, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मॉरिशस आणि ब्रिटन यांच्यात 2025 मध्ये झालेल्या करारावर ट्रम्प यांनी टीका केली. तसेच, चॅगोस बेटांवरील दिएगो गार्सिआ मॉरिशसला देऊ नका. भविष्यात इराणने हल्ला केलाच त्याविरोधात या बेटांचा वापर करता येऊ शकतो, असेही ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर संदेशात म्हटले आहे. तसेच, कोणत्याही भूभागासाठी भाडेतत्वाची पद्धत चुकीची असल्यावरही त्यांनी टीका केली असून, याबाबत मी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना सांगत आलो असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. (Chagos Islands)
2025 मध्ये ब्रिटन आणि मॉरिशस यांच्यात झालेल्या कराराला अमेरिकेनेही मान्यता दिली होती. मात्र, आता ट्रम्प या करारावर शंका निर्माण करताना दिसत आहेत. (Chagos Islands)
ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतरही ब्रिटनने त्यांच्या भूमिकेवर कायम राहाणर असल्याचे जाहीर केले असून, हा करार आमच्या व मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले होते. चॅगोस बेटांवरील लष्करी तळाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, करार करणे हाच एकमेव मार्ग असल्याचेही ब्रिटनने म्हटले आहे, तर ट्रम्प यांनी विरोध केल्यानंतरही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या ब्रिटन आणि मॉरिशस यांच्यातील कराराला पाठिंबा दर्शवला असून, पुढील आठवड्यात या कराराबाबत अमेरिका आणि मॉरिशस यांच्यात चर्चा होणार असल्याचे जाहीर केले आहे. (Chagos Islands)
हेही वाचा: Pax Silica: भारत-अमेरिकेचे ‘पॅक्स सिलीका’ करारावर शिक्कामोर्तब
चॅगोस बेटांच्या वादाचा कालखंड (Chagos Islands)
- 1814 - मॉरिशिससह चॅगोस बेटे ब्रिटिश साम्राज्याचा भाग
- 1965 - ब्रिटिशांनी मॉरिशिसपासून चॅगोस बेटे तोडली
- 1965 - चॅगोस बेटांना ‘ब्रिटिश इंडियन ओशन टेरेटरी’ म्हणून मान्यता, गरज नसेल तेव्हा मॉरिशसला बेटे पुन्हा देण्याचे ब्रिटनचे आश्वासन
- 1970 - धोरणात्मक तळउभारणीसाठी स्थानिकांना हुसकावले
- 1980 - मॉरिशसचे या बेटांवरील ब्रिटिश सत्तेला आव्हान
- 2010 - मॉरिशसची ब्रिटनविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
- 2019 - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मॉरिशसच्या बाजूने कौल
- 2022 - ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची मॉरिशसबरोबर चर्चेस मान्यता
- 2024 - सत्तेत आलेल्या मजूर पक्षाने संयुक्त निवेदनाद्वारे करार झाल्याचे जाहीर केले.
- 2025 - ब्रिटन व मॉरिशसची अधिकृत करारावर स्वाक्षरी