मुंबई : (Jyostute Book Launch) आज फुले, शाहू, आंबेडकर असते तर त्यांनी संघाचे समर्थन केले असते. कारण त्यांची चळवळ कुठल्या विचारधारेची नव्हती, ती उपेक्षितांना न्याय देण्याची होती. आज देशातली सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेच कार्य करत आली आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर यांनी नक्कीच त्यांचे समर्थन केले असते", असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.(Jyostute Book Launch)
लेखक अवधूत वाघ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दांकित झालेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे बहुप्रतिक्षित 'जयोस्तुते' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दि, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता. पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.(Jyostute Book Launch)
उपस्थितांना संबोधत भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर हे कधी डाव्या चळवळीचे नव्हते. ते कम्युनिस्ट नव्हते. डावी चळवळ उदयास आली नव्हती तेव्हापासूनचे ते आहेत. हल्ली फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव जेवणात वापरणाऱ्या मिठाप्रमाणे वापरले जाते; स्वादानुसार! प्रत्येकाचा फुले-शाहू-आंबेडकर आज स्वादानुसार असतो.(Jyostute Book Launch)
पुढे ते म्हणाले, संघ १०० वर्ष का टिकून राहिला? कारण संघाने १०० वर्षांत स्वतःला समाजासोबत जोडून घेतले. संघाच्या विरोधात काम करणाऱ्यांनी स्वतःला समाजापासून तोडण्याचे काम केले. संघाने स्वतःला समाजाशी जोडून ठेवलं. म्हणून संघ इतकी वर्ष टिकून आहे.(Jyostute Book Launch)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'संघाची पुढची दिशा व आव्हाने' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुढारी माध्यम समूहाच्या मुख्य संपादिका मृणालिनी नानिवडेकर, मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, ज्येष्ठ गांधीवादी पत्रकार जतिन देसाई, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांचा विशेष सहभाग होता.(Jyostute Book Launch)
हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
एक बाल स्वयंसेवक, युवा स्वयंसेवक म्हणून संघ शाखेत गेलो. इथे माझ्यावर संस्कार घडत गेले. जगातल्या कुठल्याही गोष्टी समान नसतात. असमानता असते पण त्यात उच्च निचता नसते. उच्च निचता जशी वस्तूत नसते, तशी मानवात ही नसते ही संघाची शिकवण आहे. हिंदू संघटन करताना समरसतेचा भाव जागृत व्हावा, हे कार्य संघ गेली शंभर वर्ष करत आहे.(Jyostute Book Launch)
- अवधूत वाघ, पुस्तकाचे लेखक
संघाविषयी अनेक पुस्तके वाचली; काही संघाचा प्रवास मांडणारी, काही विरोधात लिहिलेली. संघाने स्थापनेपासून जात, पाय, धर्म पाळलेला नाही. राष्ट्राप्रती प्रेम बाळगणारा मुसलमान हा आपलाच आहे, या भावनेने संघ कार्य करत आलाय. द्वेष संघाबद्दल पूर्वीपासून सातत्याने बाळगला गेला, तो आजही तसाच आहे.(Jyostute Book Launch)
- संदीप आचार्य, ज्येष्ठ पत्रकार
चाळीत वाढलेला एका गिरणी कामगाराचा मुलगा, एकही पुस्तक विकत घेऊ न शकलेल्या अवधूत यांनी आज स्वतः संघाविषयी पुस्तक लिहिले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मित्र म्हणून तो प्रतिभावंत लेखक झालाय याचा मला आनंद आहे. मनुष्य बिघडवण्यासाठी सध्या समाजात प्रयत्न सुरू आहेत, अशावेळी हे पुस्तक का महत्वाचे आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. जीवन जगण्याचे सूत्र या पुस्तकात आहे.(Jyostute Book Launch)
- सुनील कर्वे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
मी संघाचा स्वयंसेवक याचा मला अभिमान. सेवा परमो धर्म हेच आपल्या शिकवले. संघाचा स्वयंसेवक सेवा करून काम करतो, कोणाचे धर्म परिवर्तन करत नाही. देशभक्त युवा निर्माण करण्याचे काम संघाने केले, ते इतर कोणतीही संघटना करू शकली नाही. आम्हाला अंध भक्त म्हणत असाल तर आम्ही अंधभक्त आहोत, मात्र आम्ही ते अंधभक्त आहोत जे राष्ट्राला पुढे घेऊन जायचे कार्य करत आहोत.(Jyostute Book Launch)
- संजय उपाध्याय, आमदार