
अंतरिम जामीनावर बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद…” असे लिहित कृतज्ञता व्यक्त केली. पोस्ट अतिशय साध्या आणि भावनिक शब्दांत लिहिलेली असून त्यांनी हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
विशेष म्हणजे, या पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्याही नकारात्मक बाबींचा उल्लेख केला नाही. उलट, सकारात्मक सूर राखत चाहत्यांप्रती आभार व्यक्त केले. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत “तू आमच्या पिढीचा हिरा आहेस” अशा शब्दांत पाठिंबा दर्शवला. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
कॉमेडी भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले राजपाल यादव काही दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणामुळे चर्चेत होते. सध्या त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पुढे या प्रकरणात ते कोणते कायदेशीर पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
नेमकं प्रकरण काय?
२००९-१० च्या सुमारास राजपाल यादवच्या करिअरचा सुवर्णकाळ सुरू होता. तो एका वर्षात अनेक चित्रपट करत होता. अभिनयात यश मिळाल्यानंतर त्याने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही हात आजमावण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये त्याने ‘अता-पता लापता’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात त्यांने केवळ मुख्य भूमिका साकारली नाही, तर दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही स्वतः सांभाळली. अधिकृतरित्या निर्मात्याच्या भूमिकेत त्याची पत्नी राधा यादवचे नाव देण्यात आले होते. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
‘अता-पता लापता’मध्ये अनेक अनुभवी कलाकारांचा सहभाग होता. असरानी, ओम पुरी, मनोज जोशी, आशुतोष राणा, विजय राज, गोविंद नामदेव, शरत सक्सेना यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांनी चित्रपटात काम केले. कॉमेडी जॉनर आणि अनुभवी कलाकारांची फौज पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. राजपालने स्वतः ‘मानव चतुर्वेदी’ ही प्रमुख भूमिका साकारली होती. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
चित्रपट निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यात आली. अहवालांनुसार, सुमारे ११ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला. त्यासाठी राजपालने स्वतःची बचत गुंतवली आणि दिल्लीस्थित एका कंपनीकडून सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जाते. चित्रपट यशस्वी ठरल्यास कर्जाची परतफेड सहज होईल, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘अता-पता लापता’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाची कमाई अत्यंत कमी राहिली. मोठ्या बजेटच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवरील उत्पन्न नगण्य ठरले. या अपयशामुळे राजपाल यादववर आर्थिक ताण वाढला. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
कर्जाची परतफेड न झाल्याने संबंधित कंपनीने कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला. चेक बाऊन्स प्रकरणासह विविध तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणामुळे राजपालला न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागला. ही परिस्थिती त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी कठीण ठरली. मात्र त्यानंतर त्याने पुन्हा अभिनयाकडे लक्ष केंद्रीत करत हळूहळू चित्रपटसृष्टीत सक्रियता वाढवली. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
व्याज, दंड आणि विलंब शुल्काच्या वाढत्या ओझ्यामुळे थकबाकीची रक्कम तब्बल ९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्जाची परतफेड करण्यासाठी राजपाल यादव यांनी कर्जदात्याला अनेक धनादेश (चेक) दिले होते. मात्र हे सर्व धनादेश बाऊन्स ठरले. त्यानंतर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यानुसार त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)
दरम्यान, २ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर ५ फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांनी अधिकाऱ्यांसमोर हजर होत आत्मसमर्पण केले. (Rajpal Yadav Cheque Bounce Case)