AI for Agri 2026: मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद

21 Feb 2026 17:44:54

AI for Agri 2026
 
मुंबई : (AI for Agri 2026) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा यासाठी ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर अॅग्री २०२६) ही परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबद्दलची माहिती दिली. (AI for Agri 2026)
 
येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ही परिषद होणार आहे. कृषि क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. एआय फॉर ॲग्री २०२६ ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक, इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर इी सेमी ॲरीड ट्रापीक्स, भारतीय विज्ञान संस्था, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन, जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. (AI for Agri 2026)
कसा असेल कार्यक्रम?
 
या परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २२ फेब्रुवारीला सकाळी ९.०० ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल. सकाळी १० ते ११.२० या वेळेत कृषि प्रदर्शनाचे उदघाटन होईल. जस्मीन हॉल येथे एकाच वेळी वेगवेगळ्या तीन विषयावर एकाच वेळी चर्चासत्र होतील. सकाळी ११.३० ते १ वाजून ५ या वेळेत इन्फोसिस आणि आधार कार्डचे जनक सह-संस्थापक नंदन निलेकणी, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय सचिव देवेश चतुर्वेदी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर , डिजीटल एफएओचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देजान जाकोवेजिक, सीफोरआयर इंडिया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण , आयएफएडीच्या आयसीटीच्या तांत्रिक कायदेशीर सल्लागार बेंड्रा गुंडे,युनडीपीच्या निवासी सल्लागार डॉ.ॲजेला लुसिगी यांची व्याख्याने होणार आहेत. (AI for Agri 2026)
 
हेही वाचा : ‘एआय समिट’चे थरुरांकडून स्वागत, युवा काँग्रेसकडून गदारोळ
 
त्यानंतर दुपारी २ ते २.५० या वेळेत एच. टी. पारेख फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक एस. पारेख, केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय महासंचालक, आयसीएआर आणि सचिव डॉ. मांगी लाल जाट, इंडिया अल मिशन, अतिरिक्त मिशन संचालक आणि सीईओ अभिषेक सिंह, एडीबी इंडिया रेसिडेंट मिशन मियो ओका कंट्री डायरेक्टर, कंट्री संचालक मिया ओका, यूएन वुमनच्या कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह इंडिया कांता सिंह यांची व्याख्याने होतील. (AI for Agri 2026)
 
दुपारी ३ ते ४.१० या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. जितेंद्र सिंह, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, इंडिया एआय मिशनचे अतिरिक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह, अपर मुख्य सचिव (कृषी) विकास चंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. (AI for Agri 2026)
 
दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत जॅस्मिन हॉल येथे विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध मान्यवरांच्या उपस्थित शेतीशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत समारोप सत्र, एआयफॉर अॅग्री २०२७ परिषदेच्या थीमची घोषणा करण्यात येणार आहे. (AI for Agri 2026)
 
 
Powered By Sangraha 9.0