मुंबई : (Navnath Ban) ‘एआय समिट’मधील युवक काँग्रेसचे आंदोलन म्हणजे आंतराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे, अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली. (Navnath Ban)
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "युवक काँग्रेसचे एआय समिटमधील कपडे काढण्याचे आंदोलन लाजिरवाणे होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली जात आहे. देशाची प्रगती आणि वाढती ताकद यामुळे अस्वस्थ असलेल्या काँग्रेसने लांछनास्पद कृत्य केले. काँग्रेसच्या या देशविरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी काल भाजयुमो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि आजही राहुल गांधी भिवंडी कोर्टात जात असताना भाजयुमो कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. देशविरोधी अजेंडा राबवणाऱ्या काँग्रेसला आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल." (Navnath Ban)
देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न
"मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून राहुल गांधी देशात अस्वस्थता, अराजक माजवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आधीही भारतातील युवा पिढी नेपाळसारखे अराजक भारतात माजवेल असे लाजिरवाणे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. पण भारतातील युवा पिढी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी काहीही फरक पडणार नाही," असेही ते म्हणाले. (Navnath Ban)
संघाची आणि देशाची बदनामी करणे काँग्रेसचा आवडता उद्योग
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महात्मा गांधी हत्या यांचा सूतराम संबंध नसताना राहुल गांधी संघावर बिनबुडाचे आरोप करतात. याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्पष्टता दिली आहे. तसेच तत्कालीन काँग्रेस सरकारने स्पष्टता दिली असतानाही राहुल गांधी बरळत आहेत. संघाची आणि देशाची बदनामी करणे हा काँग्रेसचा आवडता उद्योग झाला आहे. जामीनावर बाहेर असलेले नेते देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत," असा टोलाही त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. (Navnath Ban)
आदित्य ठाकरेंच्या मताला पक्षात किंमत नाही
"दादा भुसे यांच्यावर कथित घोटाळ्याचे बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी राऊतांवर मालेगाव कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला सुरू आहे. त्या प्रकरणात राऊतांना मालेगाव कोर्टात जाऊन नाक घासायला लागणार आहे . पुराव्याविना खोटे आरोप केल्यावरून अशा पद्धतीने राऊतांना मालेगाव कोर्टातच नाही तर रोज नाक घासून माफी मागायला लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरी संजय राऊत यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मताला काडीची किंमत नाही हेही यावेळी सिद्ध होईल. आदित्य ठाकरे यांना आपला अजेंडा आणि पसंतीचे नाव बाजूला ठेवावे लागेल आणि राऊत यांनी पुढे केलेल्या शरद पवारांच्या नावावर संमती दर्शवावी लागेल. राऊतांची टर्म संपल्यानंतर ते पुढच्या वेळी काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार असतील, हे लिहून घ्या," असा टोलाही नवनाथ बन यांनी लगावला. (Navnath Ban)