Ravindra Chavan : भिवंडी महापालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार - रवींद्र चव्हाण

21 Feb 2026 14:58:29
Ravindra Chavan
 
मुंबई : (Ravindra Chavan) भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणाऱ्या नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबतच्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली.
 
हेही वाचा : Sharmila Pimpolkar : महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ‘रेबीज मुक्त ठाणे’ मोहिमेचा शुभारंभ 
 
पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, "महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर वाद टाळण्यासाठी भाजप प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज असलेल्या चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये, यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नांना यश आले नाही. बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार आहे," असे त्यांनी सांगितले.(Ravindra Chavan)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0