Dr. Tejas Garge : शिवछत्रपती नसते तर आपले अस्तित्व नसते

रूईया महाविद्यालयातील दुर्गोत्सव कार्यक्रमात डॉ. तेजस गर्गे यांचे प्रतिपादन

Total Views |
Dr. Tejas Garge
 
मुंबई : (Dr. Tejas Garge) आजच्या घडीला नविन पिढी म्हणजेच जेन झी नेहमी एक प्रश्न विचारतात की, आपल्याला या किल्यांचा आता काय उपयोग आहे. यावर त्यांना सांगावे लागते की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपले अस्तित्व नसते, आपण जे काही आहोत ते शिवरायांमुळे आहोत, असे मत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे (Dr. Tejas Garge) यांनी व्यक्त केले.
 
रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित दुर्गोत्सव – गाथा संघर्ष आणि शौर्याची या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो. शिवछत्रपतींचे कार्य यासाठी महत्वाचे आहे की, १७ व्या शतकात महाराजांच्या समकालीन एकाही व्यक्तीने रयतेच्या कल्याणाचा विचार मांडलेला नाही फक्त शिवाजी महाराजांनी तो विचार केला आहे.(Dr. Tejas Garge)
 
ते (Dr. Tejas Garge) पुढे म्हणाले की, युनेस्कोने किल्ल्यांना जागतिक दर्जा देण्यासाठी किल्ल्यांचे स्थापत्य, शैली याचा विचार केलाच आहे. परंतु त्याबरोबर त्यांनी हा देखील विचार केला की, त्या काळात स्वराज्याची कल्पना मांडणारा एकही राजा नव्हता, तो विचार फक्त शिवरायांनी केला होता, त्यामुळेच युनेस्कोमध्ये १२ किल्ल्यांना स्थान मिळू शकले. आपणही आता हि शिवनीती अधिकाधिक शिकण्याची गरज आहे.(Dr. Tejas Garge)
 
रूईया महाविद्यालयाचा इतिहास विभाग “मुद्रा” या नावाने दरवर्षी एक थीम घेऊन वार्षिक कार्यक्रम आयोजित करते. यावर्षीच्या मुद्रा २०२६ ची थीम स्वराज्यातील बारा किल्ल्यांना 'मराठा मिलिटरी लँडस्केप' अंतर्गत युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर 'दुर्गोत्सव - गाथा संघर्ष आणि शौर्याची' अशी ठेवण्यात आली होती.(Dr. Tejas Garge)
 
महाविद्यालयाच्या प्रांगणात मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, शस्त्रास्त्र प्रदर्शन, किल्ले प्रदर्शन करण्यात आले होते. त्याचबरोबर १२ किल्ल्यांना जागतिक स्थान मिळाल्याचा गौरव म्हणून १२ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.(Dr. Tejas Garge)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.