मुंबई : (ST Corporation) दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांच्या तुटीचा सामना करत आर्थिक दबावाखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) (ST Corporation) नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करण्यासाठी यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे (ST Corporation) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. “बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल. एसटीला पुन्हा आर्थिक बळ मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये असून, उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे रोजची तूट १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरात आहे.(ST Corporation)
कोरोना पूर्वीचा सुवर्णकाळ आणि नंतरची घसरण
कोरोना महामारीपूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेत होते. मात्र महामारीचा फटका आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या काही वर्षांत बसखरेदी ठप्प झाली. परिणामी २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. दरम्यान, राज्य शासनाने महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिल्यानंतर प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागली. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करत असले, तरी अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत.(ST Corporation)
एसटीच्या (ST Corporation) दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये , ३,००० ‘३x२’ आसनरचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार असून, या बसेसना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात आले आहे. दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर या बसेस धावतील. ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १०० मिडी बसेस दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी खरेदी केल्या जाणार आहेत. २०० अत्याधुनिक बसेस खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी ताफ्यात दाखल केल्या जातील. या सर्व बसेस ताफ्यात आल्यानंतर दररोज ७० ते ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.(ST Corporation)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.