Western Railway 15 Coach EMU : भारतीय बनावटीची पहिली १५ डब्ब्यांची लोकल तयार

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार पहिली स्वदेशी १५ डब्यांची ट्रेन

Total Views |
Western Railway 15 Coach EMU
 
मुंबई : (Western Railway 15 Coach EMU) इंटिग्रल कोच फॅक्टरीने पहिली १५ डब्यांची ईएमयू रेक तयार करत भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.(Western Railway 15 Coach EMU) ही भारतीय रेल्वेतील पहिलीच १५ डब्यांची ईएमयू रेक असून ती मुंबई विभागात सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील वाढती गर्दी आणि त्याअनुषंगाने आवश्यक सुविधांना डोळ्यासमोर ठेवत हे १५ डब्यांचे रेक तयार करण्यात आले आहे. या एक ट्रेनमध्ये सुमारे ७,५५५ प्रवासी प्रवास करू शकणार असून पश्चिम विभागातील गर्दी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.(Western Railway 15 Coach EMU)
 
आगामी काळात अशा आणखी १२ ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही ट्रेन रुळावर आली. या प्रसंगी आयसीएफचे महाव्यवस्थापक यू. सुब्बा राव यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत देशाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे डबे सातत्याने तयार केल्याबद्दल कौतुक केले. तसेच पीसीएमई एन. एस. आर. प्रसाद यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.(Western Railway 15 Coach EMU)
 
पश्चिम रेल्वेमार्गावर आतापर्यंत १२ डब्यांना तीन डबे जोडून १५ डब्यांच्या लोकल तयार केल्या जात होत्या.(Western Railway 15 Coach EMU) परंतु, त्यामुळे नवीन लोकल रेकमध्ये वाढ होत नव्हती. तसेच डब्यांची कमतरता भासत होती. यावर उपाय म्हणून पहिली सलग १५ डब्यांची पूर्ण स्वदेशी बनावटीची लोकल आयसीएफने तयार केली आहे. ही लोकल दि. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. तसेच अशी दुसरी लोकल फेब्रुवारीअखेरपर्यंत येण्याची चिन्हे आहेत. अशा प्रकारच्या आणखी १२ लोकल लवकरच पाठवण्यात येणार आहे.(Western Railway 15 Coach EMU)
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.