CM Devendra Fadnavis : गडचिरोलीत माओवाद्यांच्या भीतीच्या प्रतीकांचा अंत; लोकशाहीचा निर्णायक विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    20-Feb-2026
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके उद्ध्वस्त करणे ही केवळ संरचना हटवण्याची कारवाई नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनात निर्माण झालेल्या भीतीवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे.
 
गडचिरोली पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीपणे राबवलेल्या या संयुक्त मोहिमेबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, दुर्गम आणि अतिदुर्गम भागांत माओवाद्यांकडून उभारण्यात आलेली ही स्मारके स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तसेच आपले अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी वापरली जात होती. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण, ठाम आणि बहुआयामी माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला आहे.(CM Devendra Fadnavis)
 
सुरक्षा कारवाया, प्रभावी आत्मसमर्पण धोरण, पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प तसेच स्थानिक नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण भीतीपासून विश्वासाकडे आणि हिंसेपासून विकासाकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कारवाईत गडचिरोली पोलीस दल, सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांचे सुमारे ८०० जवान सहभागी झाले होते. बीडीडीएस पथकाच्या सखोल तपासणीनंतर एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील अतिसंवेदनशील जंगल परिसरात उभारलेली ४४ स्मारके नेस्तनाबूत करण्यात आली.(CM Devendra Fadnavis)
 
ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे द्योतक असून, माओवादमुक्तीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(CM Devendra Fadnavis)