Budget Session Maharashtra 2026 : एक महिन्याच्या अधिवेशन काळात ११ सुट्या

    20-Feb-2026   
Total Views |
Budget Session Maharashtra 2026
 
मुंबई : (Budget Session Maharashtra 2026) येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र, तब्बल ३१ दिवस चालणाऱ्या अधिवेशन काळात एकूण ११ दिवस सुट्या आल्याने त्यादिवशी कामकाज बंद असणार आहे. सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर, ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. जवळपास १ महिना चालणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण ११ सुट्या आल्या आहेत.
 
अधिवेशन काळात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. तर, सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही. त्यानंतर अधिवेशन काळात ३ शनिवार आणि ४ रविवार असल्याने शासकीय सुट्टी असणार आहे.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....