संशोधन, गुणवत्ता आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर आज कित्येक भारतीय कंपन्या राष्ट्रीय ते जागतिक स्तरावरही उत्तुंग भरारी घेत आहेत. ही भरारी घेत असताना कामगारांची सुरक्षितताही केंद्रस्थानी दिसून येते. ही सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक सामग्री बनविणारी भारतातील एक अग्रणी कंपनी म्हणून ‘व्हीनस सेफ्टी अॅण्ड हेल्थ प्रा. लि.’ नावारूपास आली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या कारकिर्दीवर एक नजर...
आजच्या औद्योगिक युगात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पना केवळ घोषवाये राहिलेल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्ष कृतीत उतरू लागल्या आहेत. उत्पादनवाढ, तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक स्पर्धा या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी कामगारांची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा ठळकपणे दिसून येतो. भूतकाळात औद्योगिक अपघात, रासायनिक गळती, स्फोट किंवा आग लागल्याच्या घटनांनी अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्यावेळी सुरक्षित आणि प्रमाणित सुरक्षासाधनांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. या कटू अनुभवांनी देशाला स्वदेशी सुरक्षा उपकरणांच्या निर्मितीचे महत्त्व पटवून दिले. परिणामी, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रशिक्षण यांवर भर देत भारतीय कामगारांच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवण्याचा दृष्टिकोन विकसित झाला.
या पार्श्वभूमीवर ‘व्हीनस सेफ्टी अॅण्ड हेल्थ प्रा. लि.’ हे नाव विशेषत्वाने पुढे येते. १९८६ साली स्थापन झालेली आणि नवी मुंबई येथे मुख्यालय असलेली ही कंपनी गेली चार दशके औद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण करत आहे. वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) आणि प्रगत ‘एअर फिल्ट्रेशन सोल्यूशन्स’ तयार करणारी ही कंपनी स्वदेशी उत्पादनक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. डिझाईनपासून ते उत्पादन आणि चाचणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘इन-हाऊस’ तांत्रिक कौशल्य विकसित करत कंपनीने आत्मनिर्भरतेचा भक्कम पाया रचला आहे.
सात अत्याधुनिक उत्पादन युनिट, सुमारे सहा लाख चौ. फूटांहून अधिक विस्तारलेली सुविधा आणि दररोज सुमारे १५ लाख युनिट्स तयार करण्याची क्षमता यांमुळे कंपनी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकते. औद्योगिक क्षेत्र, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद, लीनरूम आणि उत्पादन उद्योग अशा विविध क्षेत्रांत तिची उत्पादने वापरली जातात. उच्च दर्जाची पीपीई किट्स, आय-प्रोटेशन सोल्यूशन्स, रेस्पिरेटरी मास्क आणि हेपा एअर फिल्ट्रेशन सिस्टम यांसारखी उत्पादने टिकाऊपणा, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन लक्षात घेऊन विकसित केली जातात. संशोधन आणि विकासातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित झाले असून कंपनीची उत्पादने आज ३२ पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होतात. यामुळे भारतीय उत्पादनाची गुणवत्ता जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे.
कारखान्यातील कामगारांच्या दृष्टीने या प्रयत्नांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. रोज यंत्रसामग्री, उष्णता, रसायने आणि धूर यांच्या सान्निध्यात काम करणार्या कामगारांसाठी सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. कंपनी कायद्याने कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी स्पष्ट तरतुदी केल्या असल्या, तरी त्या प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी दर्जेदार आणि सहज उपलब्ध सुरक्षासाधनांची गरज असते. स्वदेशी उत्पादनामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक साधने त्वरित उपलब्ध होऊ लागली. यामुळे उद्योगांना सातत्य मिळाले आणि कामगारांच्या जीवितास अधिक संरक्षण मिळाले.
कंपनीची सामाजिक जबाबदारी ही तितकीच उल्लेखनीय आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग, कौशल्य विकास कार्यक्रम, संरचित इंटर्नशिप, अनुदानित पौष्टिक आहार, नियमित वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षित कार्यपरिसर या माध्यमातून उद्योग आणि समाज यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. उद्योग केवळ नफ्यासाठी नसून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असतो, याची जाणीव या उपक्रमांतून दिसून येते.
आज भारत औद्योगिक विस्ताराच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. स्मार्ट मॅन्युफॅचरिंग, डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिक निर्यात यांचा वेग वाढत असताना सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. सुरक्षित कामाचे वातावरण ही केवळ कायदेशीर अट नसून प्रत्येक कामगाराचा मूलभूत हक्क आहे. भूतकाळातील अपघातांनी दिलेला धडा आणि भविष्यातील प्रगत उद्योगांची वाढ लक्षात घेता, ‘व्हीनस सेफ्टी’सारख्या कंपन्या भारताला सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर औद्योगिक राष्ट्र म्हणून अधिक ठामपणे उभे करण्यास हातभार लावत आहेत.