मुंबई : (Mumbai Transport Stack) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेत डिजिटल परिवर्तनाची नवी पहाट उगवू लागली आहे. शहरातील विविध वाहतूक साधनांना एकाच डिजिटल छत्राखाली आणणारा ‘मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक’ (Mumbai Transport Stack) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता कार्यान्वित होण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. या उपक्रमामुळे मुंबईकरांना स्वस्त, वेगवान आणि अधिक सुसूत्र प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार असून, शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता या प्लॅटफॉर्ममध्ये आहे.(Mumbai Transport Stack)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पथदर्शी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेसाठी जायकासोबत भागीदारी केली आहे. डेटा-आधारित वाहतूक प्रणाली उभारण्यात जागतिक स्तरावर काम करणाऱ्या जायकाच्या ‘Dx Lab’ च्या सहकार्याने हा प्रकल्प साकारला जाणार आहे.(Mumbai Transport Stack)
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वात नुकत्याच झालेल्या बैठकीत या उपक्रमाचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी महा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, उप महानगर आयुक्त अजिंक्य पडवळ तसेच, जायकाच्या विज्ञान, तंत्रज्ञान माहिती व डिजिटल परिवर्तन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Mumbai Transport Stack)
‘मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक’ (Mumbai Transport Stack) ही एक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असून ती ‘मोबिलिटी अॅज अ सर्व्हिस’ या संकल्पनेवर आधारित आहे. स्टँडर्ड डेटा एक्सचेंज प्रोटोकॉलच्या माध्यमातून मेट्रो, बस, उपनगरीय रेल्वे, टॅक्सी आणि इतर वाहतूक सेवा एकमेकांशी जोडल्या जातील. नागरिक, सेवा पुरवठादार आणि शासन यांच्यासाठी एकात्मिक, पारदर्शक आणि सुलभ व्यवस्था उभारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.(Mumbai Transport Stack)
सर्व वाहतूक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर
या प्लॅटफॉर्मची रचना ओपन सोर्स तत्त्वावर आधारित असून, गोपनीयतेची हमी, सुरक्षितता, परस्पर जोडणी आणि भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन त्याची उभारणी केली जात आहे. सुरक्षित ‘डेटा हायवे’च्या माध्यमातून सर्व वाहतूक माहिती एकत्रित केली जाईल. त्यामुळे शहर नियोजन अधिक अचूक होईल आणि वाहतूक कोंडी, मार्ग नियोजन यांसारख्या बाबींमध्ये सुधारणा करता येईल.(Mumbai Transport Stack)
सामान्य नागरिकांना याचा काय फायदा?
सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा बदल अधिक सोयीस्कर ठरणार आहे. एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. ट्रेन, बस आणि मेट्रोचे रिअल-टाईम लोकेशन मोबाईलवर उपलब्ध होईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध पर्यायांची तुलना करून प्रवास नियोजन करता येईल. तसेच रिअल-टाईम पार्किंग माहितीही मिळणार आहे. याशिवाय, ‘ओपन एपीआय’च्या माध्यमातून स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञांना नवकल्पना विकसित करण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर मुंबईत डिजिटल वाहतूक क्षेत्रात नव्या उद्योगसंधीही निर्माण होण्याची अपेक्षा आहे.(Mumbai Transport Stack)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.