नवी दिल्ली : (CM Devendra Fadnavis) राज्यसभेत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचे ७ पैकी ६ लोक निवडून येणे पक्के आहे. एक जागा विरोधकांना मिळेल, ती कुणी घ्यायची हे ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'एआय फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स' या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "इंडिया एआय समिटमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक नेत्यांनी भारतात येऊन एआयवर विचारविनिमय करणे आणि भारतानेसुद्धा एआयच्या क्षेत्रातील शक्तीचे प्रदर्शन करणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषत: एआय इन अॅग्रीकल्चरमध्ये देशात महाराष्ट्राने गती घेतली आहे. महाराष्ट्रात एआय फॉर अॅग्रीकल्चर २०२६ ही एक मोठी समीट आपण घेणार आहोत. विशेषत: वातावरणातील बदलांमुळे शेतीवर परिणाम होत असल्याने आपण एआयच्या माध्यमातून क्लायमेट प्रुफ अॅग्रीकल्चर करू शकतो."(CM Devendra Fadnavis)
"महाविस्तार हे पहिले व्यासपीठ आहे ज्यात आपण आपल्या भाषेत शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. महाराष्ट्राने शेतीच्या क्षेत्रातील देशातील सगळ्यात चांगले एआय व्यासपीठ तयार केले असून २५ लाख शेतकरी या व्यासपीठाचा उपयोग करतात. केंद्र सरकारनेसुद्धा या व्यासपीठाची दखल घेतली आहे. पुढच्या काळात एआय फॉर अॅग्रीकल्चर समीटमध्ये जगभरातून लोक यावे, असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जिथे एआय इन अॅग्रीकल्चरसाठी ५०० कोटी रुपयांचा फंड तयार केला. पण एआय करिता फंडची आवश्यकता नसून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार करणे आणि ट्रेंड असलेले एआय मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र या दोन्ही गोष्टी तयार करतो आहे," असेही त्यांनी सांगितले.(CM Devendra Fadnavis)
"मागच्या काळात आपण एआयचा उपयोग करून गुलाबी बोंड अळीपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवू शकलो. अन्यथा २०१७ मध्ये गुलाबी बोंड अळीमुळे संपूर्ण कापसाचे पीक नष्ट झाले होते. पण आता शेतकरी यावर काम करत आहेत. पुढच्या काळात सर्व क्षेत्रांमध्ये एआय रेडी असे आपले राज्य असेल," असेही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) यावेळी सांगितले.
विरोधकांची प्रवृत्ती देशहिताची नाही
राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "जगाने भारताची शक्ती बघितली. एखादी घटना घडल्यास तेवढीच घटना घेऊन बसायचे आणि देशाला बदनाम करायचे, ही प्रवृत्ती काँग्रेस आणि विरोधी पक्षात दिसते. ही देशहिताची प्रवृत्ती नाही. जगातील महत्वाचे लोक एआयकरिता भारतात येतात आणि भारताने एआयमध्ये केलेल्या कामांची प्रशंसा करतात हे महत्वाचे आहे. अनेकवेळा जिथे मानवी बुद्धिमत्ता नगण्य असतो, तिथे मानवी बुद्धिमत्तेला सहकार्य करण्यासाठीसुद्धा एआयचा वापर होऊ शकतो. त्यामुळे राहुल गांधींनी जबाबदार एआयचा वापर केला तर ते असे बोलणार नाही."(CM Devendra Fadnavis)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....