मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील एका लेखाचा हवाला देत भाजप सरकारवर टीका केली. यावर भाजपने नरवणे यांचा एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारताने गलवान खोऱ्यात एक इंचही जमीन गमावलेली नाही.
लोकसभेत राहुल गांधी म्हणाले की, गलवान खोऱ्यात चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. जनरल नरवणे स्वतः त्यांच्या पुस्तकात लिहितात की, कैलास रिज पर्यंत चीनचे रणगाडे आले होते, डोकलाममध्येही पोहचले होते. राहुल गांधींच्या या विधानावर नरवणेंचा व्हिडिओ प्रसिद्ध करत भाजपने राहुल गांधी हे देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.
या व्हिडिओत नरवणे सांगत आहेत की, भारत आणि चीनमध्ये असे काही भाग आहेत ज्यावर दोन्ही देश दावा करतात. या भागात कोणत्याही खुणा किंवा खांब नाहीत. गलवानमध्ये चीनला पहिल्यांदा असे वाटले की सीमेवर रस्ता बांधण्यास विरोध होऊ शकतो. चीनने ३,००० किलोमीटरच्या अनिश्चित सीमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने एक इंचही जमीन देण्यास नकार दिला.
सरकारने घाबरु नये, पुस्तक प्रकाशित करण्यास संमती द्यावी डोकलामच्या वादाला आता ९ वर्षे उलटली आहेत. त्यावेळी चीनने स्पष्टपणे सांगितले होते की तुमची अवस्था १९६२ पेक्षा वाईट होईल. मात्र केंद्र सरकारने त्यांना ठामपणे उत्तर दिले की, आम्ही सगळ्या प्रकारे उत्तर देण्यास तयार आहोत. आम्हाला युद्ध नको आहे, शांतता हवी आहे. पण तुम्ही जर युद्ध सुरु केले तर आम्हाला युद्ध करावं लागेल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील. त्यावेळी चीनचे सैनिकही मागे हटले नाहीत आणि भारताचे सैनिकही नाहीत. राहुल गांधींनी कैलास पर्वतांचा जो उल्लेख केला त्याबाबत मी इतकेच सांगेन की भारताचे पारडे चीनच्या तुलनेत जड होते. त्यामुळे मला वाटते की हे पुस्तक छापण्यास सरकारने संमती दिली पाहिजे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.