Mangal Prabhat Lodha: इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे

    02-Feb-2026   
Total Views |
 
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई: (Mangal Prabhat Lodha) नैसर्गिक तेल आणि वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. तेल आणि वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे. या आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. (Mangal Prabhat Lodha)
 
प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 'संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६' या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. (Mangal Prabhat Lodha)
 
हेही वाचा : Sharad Pawar: शरद पवार यांना विलिनीकरणाची घाई का?
 
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी, महाराष्ट्र बीपीसीएलचे प्रमुख रिटेल (पश्चिम)चे थॉमस जेम्स, एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएलचे राज्य प्रमुख (रिटेल) चे मिहिर जोशी, एचपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक बरुण कुमार, आयओसीएलचे महाव्यवस्थापक देवांशू मिश्रा यांच्यासह राज्यातील विविध इंधन वितरक आणि शालेय विद्यार्थ्यी उपस्थित होते. (Mangal Prabhat Lodha)
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टांमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो." (Mangal Prabhat Lodha)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....