Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून हिंदूविरोधी वक्तव्य

Total Views |
 
Mamata Banerjee
 
मुंबई : (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मुर्शिदाबादमध्ये हिंदूविरोधी आणि वादग्रस्त विधान केले होते. हे विधान ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून केले असल्याचा दावा कबीर यांनी केला आहे. ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीला संबोधित करत होते. (Mamata Banerjee)
 
कबीर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी, 'आम्ही मुर्शिदाबादमध्ये बहुसंख्य आहोत. आमच्याकडे पाहण्याची हिंमत करणाऱ्या हिंदूंची कत्तल केली जाईल आणि भागीरथी नदीत फेकून दिले जाईल.' हे विधान केले होते. ते विधान करण्यासाठी त्यांना ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते असे कबीर म्हणाले. (Mamata Banerjee)
 
हेही वाचा :  Rahul Gandhi : संसदेत गदारोळ! राहुल गांधींच्या खोट्या दाव्यांना अमित शाह यांचं जोरदार प्रत्युत्तर; सत्ताधाऱ्यांनी केली बोलती बंद
 
ते म्हणाले की, बहारमपूरमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसूफ पठाण आणि मुर्शिदाबादमध्ये अबू ताहेर खान यांना विजय मिळण्याची शक्यता कमी वाटत होती, म्हणून ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबादमधील निवडणूक रॅलीदरम्यान हिंदूविरोधी वक्तव्य केले होते. बॅनर्जी यांनी गी आदित्यनाथ यांच्या हिंदुत्ववादी विधानांना विरोध करण्यासाठी देखील अशी विधाने करायला लावली होती. (Mamata Banerjee)
 
प्रचारादरम्यान हुमायूनने त्यांच्या भाषणाबद्दल जाहीरपणे माफी मागितली. ते म्हणाले, जर माझ्या भाषणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. भविष्यात मी अशी चूक पुन्हा करणार नाही. (Mamata Banerjee)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.