Madhya Pradesh: महापुरुषांचे बॅनर आणि पोस्टर्स फाडल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक

Total Views |
 
Madhya Pradesh
 
मुंबई : (Madhya Pradesh) मध्ये प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातल्या मक्सी येथे हिंदू संमेलनासाठी लावलेल्या महापुरुषांचे बॅनर आणि पोस्टर्स फाडल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी मक्सी शहरातील श्री राम गार्डनमध्ये आयोजित भव्य हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमाआधी घडली होती. यावर तीव्र प्रतिक्रिया आल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली. (Madhya Pradesh)
 
हेही वाचा:  Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून हिंदूविरोधी वक्तव्य
 
हाती आलेल्या माहितीनुसार, शाकीर फकीर मोहम्मद आणि राहुल लीलाधर गोस्वामी अशी आरोपींची नावे असून त्यांनी धार्मिक उन्माद भडकवण्याच्या भावनेने हे कृत्य केले होते. यावर हिंदू संघटनांनी आक्रमक होत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींना ताब्यात घेतले. (Madhya Pradesh)
 
पोलिसांनी आरोपींवर धार्मिक उन्माद भडकावण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी शहर पोलिस निरिक्षकांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. (Madhya Pradesh)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.