Kumbh Mela: केरळमध्ये पहिल्यांदाच कुंभमेळ्याचे आयोजन

Total Views |
 
Kumbh Mela
 
मुंबई : (Kumbh Mela) केरळमध्ये पहिल्यांदाच तिरुनावाय येथील नवमुकुंद मंदिराच्या घाटावर १८ दिवसांचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतपुजा नदीच्या काठावर आयोजित या मेळ्यात दररोज हजारो भाविक आणि साधूंनी पवित्र स्नान केले. या कुंभमेळ्यात वैदिक जप आणि नीला आरती हे प्रमुख आकर्षण आहे. (Kumbh Mela)
 
सध्या या भागात धार्मिक वातावरण असून दिवसरात्र वैदिक मंत्र चालू आहेत. संध्याकाळच्या वेळी संपूर्ण परिसर भगव्या वस्त्रधारी साधूंनी फुलुन जात आहे. यामध्ये खुद्द काशी विश्वनाथ मंदिरातील पुजारी देखील समाविष्ट आहेत. जे वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर केली जाणारी नीला आरती भारतपुजा नदीच्या काठावर करत आहेत. (Kumbh Mela)
 
हेही वाचा :  Rahul Gandhi : संसदेत गदारोळ! राहुल गांधींच्या खोट्या दाव्यांना अमित शाह यांचं जोरदार प्रत्युत्तर; सत्ताधाऱ्यांनी केली बोलती बंद
 
या कुंभमेळ्याचे मुख्य शिल्पकार स्वामी आनंदवम भारती आहेत. महत्वाची बाब म्हणजे ते पूर्वी सीपीआय (एम) ची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयचे कार्यकर्ते होते. स्वामी भारती म्हणतात की, अशी परंपरा पूर्वी तिरुनावायात अस्तित्वात होती. परंतु विविध कारणांमुळे केरळमध्ये हिंदू धर्म आणि परंपरा मागे पडल्या गेल्या. हा कुंभमेळा धर्म आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे. (Kumbh Mela)
 
या मेळ्यासाठी वाराणसी आणि ऋषिकेश ते एर्नाकुलम पर्यंत विशेष रेल्वे गाड्या चालवल्या गेल्या. आंध्र प्रदेशातील श्रीकालहस्ती येथील ब्रह्मऋषी श्री ओंकार मठाचे स्वामी मुकुंदनंदगिरी म्हणाले की, सनातन धर्माच्या पालनात केरळ मागे पडला आहे. या कुंभमेळ्यामुळे ती परिस्थिती बदलून केरळमध्ये धार्मिक वातावरण येईल. (Kumbh Mela)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.