Ganesh Khankar: भाजपाच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती; मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांची घोषणा

    02-Feb-2026
Total Views |
 
Ganesh Khankar
 
मुंबई : (Ganesh Khankar) मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्याबाबत चर्चा आणि घडामोडी तीव्र झाल्या असतानाच भाजपा गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांनी सोमवार दि.२ रोजी याबाबत घोषणा केली असून साटम यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल. (Ganesh Khankar)
 
एक अभ्यासू नगरसेवक म्हणून खणकर यांच्याकडे पाहिले जाते. तसेच अनेक वर्ष ते भाजपात सक्रीय आहेत.प्रभाग क्रमांक ७ मधून ते निवडून आले आहेत. टँकरमाफियांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मध्यंतरी त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. (Ganesh Khankar)
 
यानिवडीवेळी बोलताना आमदार अमीत साटम म्हणाले की,“ भाजपा आणि शिवसेना एक़त्र कोकण भवन येथे जातील आणि दोन्ही गटांची स्वतंत्र नोंदणी तिथे होईल. राष्ट्रवादी कोंग्रेस अजीत पवार पक्ष हा महायुतीचाच भाग असून आमचा विरोध हा मुंबईतील एका व्यक्तीस होता पक्षास न्हवता. व्यक्तीवरील आक्षेप कायम असून पक्षावर आक्षेप असण्याच काही कारण नाही.” (Ganesh Khankar)
 
हेही वाचा :  Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रीतीसंगमावर अभिवादन; अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा संकल्प!
 
भाजपा नवनियुक्त गटनेते गणेश खणकर म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक, भाजपा युवा मोर्चा बुथ प्रमुख, मुंबई भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस अशा प्रवासात पक्षाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम आणि पक्षातील मान्यवर यांनी गटनेते पदाची ही संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानतो. मुंबई महानगरपालिकेस भ्रष्टाचारमुक्त करणे आणि मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विकासाचे काम यास मुंबईत चालना देण्याचे उद्दीष्ट पूर्ण करणार आहे.” (Ganesh Khankar)
 
यावेळी आमदार अमीत साटम,मंत्री मंगलप्रभात लोढा, महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, भाजपा नवनिर्वाचीत नगरसेवक, भाजपा आमदार उपस्थित होते. (Ganesh Khankar)
 
तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तीन टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. घोले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. (Ganesh Khankar)