Dr. Vishal Kadne: प्रा. डॉ. विशाल कडणे यांच्याकडून मुंबईत महिला शिक्षकांचा गौरव

Total Views |

Dr. Vishal Kadne 
 
मुंबई : (Dr. Vishal Kadne) “सन्मान महिलांचा… आदर नारीशक्तीचा…” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली शिक्षक नेते प्रा. डॉ. विशाल कडणे आणि मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुप येथे ३१ जानेवारी रोजी महिला शिक्षकांसाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. (Dr. Vishal Kadne)
 
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या कार्यक्रमाला मुंबईतील विविध शाळांमधील महिला शिक्षकांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी आमदार अमित साटम यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल उपस्थित महिला शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष आणि मुंबई भाजपा महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी तसेच दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनीही या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याची माहिती आयोजकांनी दिली. (Dr. Vishal Kadne)
 
या कार्यक्रमात मुंबईतील नामांकित शाळांमधील २५ महिला मुख्याध्यापिका आणि सुमारे ३०० महिला शिक्षिका प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षण क्षेत्रात महिलांनी बजावलेल्या भूमिकेचा, त्यांच्या समर्पणाचा आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (Dr. Vishal Kadne)
 
हेही वाचा :अनाथांचा पालनकर्ता अनिल
 
सायंकाळी ५ वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय निकम यांनी उपस्थित राहून महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमादरम्यान बालपणी खेळले जाणारे पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. (Dr. Vishal Kadne)
 
तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांसह सर्व महिला मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक आणि शिक्षकांना डॉ. विशाल कडणे यांच्या वतीने विशेष आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. (Dr. Vishal Kadne)
 
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि समाजात नारीशक्तीप्रती आदरभाव निर्माण करणे हा होता. (Dr. Vishal Kadne)
 
आयोजक :
मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ
प्रा. डॉ. विशाल कडणे – शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी नेते, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com