मुंबई : (Ali Dawood Amich) ईराणसोबत तणाव वाढलेला असताना इस्रायलने मोठी कारवाई केली आहे. रविवारी इस्रायली सैन्याने हिज्बुल्लाहचा दहशतवादी अली दाऊद अमीच याला लक्ष्य करून ठार केल्याचे उघड झाले आहे. तो हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग विभागातील एका शाखेचा प्रमुख होता. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) यांनी सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, हा दहशतवादी दक्षिण लेबनॉनमधील अल-दुवैर परिसरात हिज्बुल्लाहसाठी लष्करी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होता. (Ali Dawood Amich)
इस्रायली सुरक्षा दलांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, “अली दाऊद अमीच याचा खात्मा करण्यात आला आहे. तो हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग विभागात ब्रँच हेड म्हणून काम करत होता. अल-द्वेइर परिसरात दहशतवादी पायाभूत रचना पुन्हा उभारणे आणि आयडीएफ सैनिकांविरोधातील हल्ले पुढे नेण्यामध्ये तो गुंतलेला होता. या दहशतवाद्याच्या हालचाली इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील करारांचे उल्लंघन करणाऱ्या होत्या.” (Ali Dawood Amich)
इस्रायल आणि हिज्बुल्लाह यांच्यात २७ नोव्हेंबर २०२४ पासून संघर्षविराम लागू आहे. मात्र, तरीही हिज्बुल्लाहकडून धोका असल्याचा दावा करत इस्रायलने लेबनॉनमध्ये कारवाया सुरूच ठेवल्या. इस्रायली सैन्याने लेबनॉन सीमेच्या जवळ पाच महत्त्वाच्या ठिकाणी आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. (Ali Dawood Amich)
या ताज्या कारवाईबाबत इस्रायली सैन्याने निवेदन जारी करत सांगितले की, मजरात अब्बूदिये परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत हिज्बुल्लाहच्या इंजिनिअरिंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वाहनांना लक्ष्य करण्यात आले. लेबनॉनच्या सरकारी नॅशनल न्यूज एजन्सीनुसार, मरजेयौन जिल्ह्यातील राब थलातीन गावात इस्रायली दलांनी सकाळच्या सुमारास घुसखोरी करून दोन घरे स्फोटकांनी उद्ध्वस्त केली, ज्यामुळे आसपासच्या घरांचेही नुकसान झाले. (Ali Dawood Amich)
रविवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक घरे आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली आणि लेबनानी सूत्रांच्या हवाल्याने काही शेतजमिनींवर कथितरित्या विषारी पदार्थांची फवारणी करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. (Ali Dawood Amich)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक