Mumbai Climate Week 2026: ग्लोबल साऊथसाठी हरित गुंतवणुकीचा नवा मंत्र

19 Feb 2026 16:13:34

Mumbai Climate Week 2026 
 
मुंबई : (Mumbai Climate Week 2026) मुंबई क्लायमेट वीक २०२६ अंतर्गत १८ फेब्रुवारी रोजी ‘फायनान्सिंग अॅट स्केल: मोबिलायझिंग ट्रिलियन्स' ग्लोबल साऊथसाठी मोठ्या प्रमाणात हवामान भांडवल कसे संमिश्रित करायचे? या विषयावर एक महत्त्वाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. (Mumbai Climate Week 2026)
 
या सत्रामध्ये व्ही. वैद्यनाथन (सीईओ आयडीएफसी बँक), अॅमल-ली अमीन (ब्रिटिश आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि हवामान प्रमुख), क्लारिसा डी फ्रँको (सल्लागार, सहयोगी हवामान भागीदार), इमाद एन. फँखौरी (प्रादेशिक संचालक, दक्षिण आशिया आयएफसी), ज्युलियन गोंजर (जागतिक शाश्वतता प्रमुख, एचएसबीसी) आणि लॉरेन्स यानोविच (वन प्लॅनेट सॉवरेन वेल्थ फंड नेटवर्कचे संस्थापक आणि सीईओ) यांसारखे तज्ज्ञ सहभागी झाले. (Mumbai Climate Week 2026)
 
हेही वाचा: Mumbai Climate Week : देशातील पहिला ‘मुंबई क्लाइमेट वीक’ सुरू  
 
सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही कार्स व बाइक्स) आणि ग्रीन इलेक्ट्रिसिटी यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून हवामान निधी कसा वाढवता येईल, यावर भर देण्यात आला. सार्वजनिक-खासगी भागीदारी, ब्लेंडेड फायनान्स आणि दीर्घकालीन हरित बाँड्स हे महत्त्वाचे उपाय असल्याचे तज्ज्ञनी नमूद केले. (Mumbai Climate Week 2026)
 
प्रोजेक्ट मुंबई यांच्या पुढाकाराने, महाराष्ट्र पर्यावरण विभाग, एमएमआरडी आणि बीएमसी यांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत ३० हून अधिक देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. भारतासारख्या देशांसाठी हरित ऊर्जा आणि ईव्ही क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचा रोडमॅप या सत्रातून पुढे आला. (Mumbai Climate Week 2026)
 
 
Powered By Sangraha 9.0