Mumbai Climate Week 2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लाइमेट वीक २०२६’चा दिमाखदार समारोप

19 Feb 2026 16:47:50
 
Mumbai Climate Week 2026
 
मुंबई : (Mumbai Climate Week 2026) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुंबई क्लाइमेट वीक २०२६ चा समारोप सोहळा १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. शहरी टिकाऊपणा आणि ग्लोबल साऊथसाठी हवामान कृती या मुख्य विषयांवर केंद्रित असलेल्या या परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावली. (Mumbai Climate Week 2026)
 
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेती, पर्यावरणसंवर्धन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार केला. पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी परिषदेत विविध सत्रांत सक्रिय सहभाग घेत शाश्वत थंडन (Sustainable Cooling) आणि UNEP संबंधित चर्चांमध्ये महाराष्ट्राच्या उपक्रमांची माहिती दिली. (Mumbai Climate Week 2026)
 
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधोरेखित करत शहर पातळीवरील हवामान कृतींचा आढावा मांडला. या परिषदेमागील प्रमुख संयोजक आणि प्रोजेक्ट मुंबईचे सीईओ शिशीर जोशी यांनी उद्घाटन भाषणात मुंबईच्या लवचिकतेवर आणि नागरिक-प्रशासन सहकार्याच्या मॉडेलवर भर दिला. (Mumbai Climate Week 2026)
 
 
Powered By Sangraha 9.0